महाराष्ट्रराजकीय

सोलापूरच्या प्रा.ज्योती वाघमारे यांना भाजपने उमेदवारी द्यावी…पहा कोणी केली मागणी

हिंदू राष्ट्र सेनेचे रवी गोणे यांची मागणी

सोलापूर : सोलापूर शहर हे मागासलेला आहे. ६० वर्षात कॉग्रेसने सोलापूर साठी पाहिजे तसा विकास केलाच नाही. २०१४ पासून भाजपचे दोन वेळा खासदार निवडून आले. परंतु दरवेळी उमेदवार बदलावे लागल्याने मतदारांमध्ये तीव्र नाराजी आहे. एक मोदी समर्थक म्हणून एकच मागणी आहे की भाजपच्या वतीने सोलापूर लोकसभेसाठी प्रा.ज्योती वाघमारे यांना उमेदवारी जाहीर करून सोलापूरकरांमध्ये उमेदवाराबाबत असलेला संभ्रम दूर करावा अशी मागणी हिंदुराष्ट्र सेना शहर प्रमुख रवि गोणे यांनी केली आहे.

शिवसेनेचे प्रवक्ते, सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून उमेदवार म्हणून सर्वात आघाडीवर असलेले नाव हे प्रा.ज्योती वाघमारे यांचे आहे. बुधवारी हिंदुराष्ट्र सेना सोलापुरच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. हिंदुराष्ट्र सेना शहर प्रमुख रवि गोणे यांच्या हस्ते प्रा. ज्योती वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला.

या भेटीप्रसंगी सोलापुरातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. प्रा. ज्योती वाघमारे या सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून चर्चेत असलेल्या उमेदवारांपैकी सर्वात आघाडीवर असलेले नाव आहे. त्याचे कारणही तसेच आहे, त्या स्थानिक उमेदवार आहेत. म्हणून त्यांना सर्वाधिक पसंती मिळत आहे.

सोलापूरात सर्व भाषिक लोक मोठ्या संख्येने राहतात. सोलापूर शहरात साडेपाच लाख तेलुगू भाषिक आहेत. प्रा.ज्योती वाघमारे स्वतः तेलुगू भाषिक आहेत. म्हणून त्याचा फायदा नक्कीच भाजप पक्षाला होणार आहे.

प्रा.ज्योती वाघमारे हिंदू मोची समाजातून येतात. त्यांचा तेलुगू, कन्नड, मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेवर मोठा प्रभुत्व आहे. त्या उच्चशिक्षित आहेत. स्व. बाळासाहेब ठाकरे व मोदी यांच्या विचारांवर चालणाऱ्या आहेत. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अगदी जवळचे आणि विश्वासू आहेत.

हिंदूराष्ट्र सेनेच्या वतीने भारतीय जनता पार्टीला एक मागणी करण्यात आली आहे. प्रा.ज्योती वाघमारे भाजपकडून सोलापूर लोकसभेसाठी अति योग्य उमेदवार आहेत. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना तोडीस तोड अशा उमेदवार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्थानिक उमेदवार असल्याने त्याचा मोठा फायदा पक्षाला नक्कीच होईल.

याप्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे प्रियदर्शन साठे, सकल हिंदू समाजाचे समन्वयक अंबादास गोरंटला, शहर संघटक आनंद मुसळे, सकल हिंदू मोची समाजाचे युवा नेते प्रकाश आसादे, श्रीकांत सुरवसे, श्रीकांत घट्टू आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login