सोलापूर बातमीपंढरपूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर धार्मिक

सोलापूरातील गुणीजणांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कडून अभिनंदन

धर्म जागरण सभा अध्यात्मिक आघाडी यांचेवतीने ह भ प भागवत चवरे महाराज यांच्या अध्यक्षते खाली व अक्षय महाराज भोसले यांच्या नेतृत्वने लक्ष्मण महाराज चव्हाण, जोतिराम चांगभले (प्रदेश अध्यक्ष ), किसन कापसे (प्रदेश उपाध्यक्ष ), इ.च्या प्रमुख उपस्थिती मध्ये सुधाकर इंगळे महाराज यांच्या संयोजनातून हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले होते.
सोलापूर शहर व जिल्ह्यातील गुणवंत वारकरी भाविकांचा सन्मान करणेसाठी व धर्म जागृती करणेसाठी कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ज्यांनी वारकरी संप्रदाय, भजन, कीर्तन या माध्यमातून सेवा केली आहे. सोलापूर मध्ये सुद्धा परंपरेने सेवा करणारे वारकरी आहेत. ते निष्काम व अखंड सेवा करत आहेत. त्यांच्या सेवेची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी त्यांचा सन्मान करण्याची इच्छा व्यक्त केली. म्हणून सोलापूर शहर व जिल्हातील दिंडी प्रमुख व गुणवंत वारकरी भाविकाचा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री यांच्या शब्दात लेखी अभिनंदन पत्र देऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगी अक्षय भोसले महाराज यांनी वारकरी संप्रदायसाठी शासकीय स्तरावर काय प्रयत्न केले ते मनोगतातून व्यक्त केले. सुधाकर इंगळे महाराज यांनी भाविक वारकरी मंडळ कडून शासनाला
1) चंद्रभागा नदी शुद्धीकरणसाठी स्वतंत्र मंत्रालय असावे.
2) माघवारीतील सर्व दिंडीला आर्थिक अनुदान मिळावे.
3) सोलापूर तिऱ्हे मार्गे पंढरपूर हा भक्ती मार्ग म्हणून घोषित करावा.
4) आषाढीवारी प्रमाणे माघवारीला आरोग्य विमा व मोफत सर्व सेवा उपलब्ध करून द्याव्यात.
अशा मागणीचे निवेदन दिले.
याप्रसंगी मान्यवरांनी देव, देश, धर्म या विषयावर मनोगत व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करणेसाठी भाविक वारकरी मंडळ पदाधिकारीनी परिश्रम घेतले

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel