सोलापूरात अवघ्या 150 रुपयात पार पडलं माजी आमदार कन्येच लग्न ; लग्नाचा खर्च टाळून विनाअनुदानित शिक्षकांना करणार मदत…

सध्या शाही विवाह करण्याचा एक प्रघात सुरु आहे.त्यासाठी लाखो करोडो रुपयांचा चुराडा होतो.मात्र या सर्व बडेजावपणाला फाटा देत अवघ्या 150 रुपयात माजी आमदार कन्येचा विवाह सोलापुरात पार पडला आहे.माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांची मुलगी सुषमा हिचा विवाह शुभम शिंदे या तरुणांशी नोंदणीकृत पद्धतीने पार पडला आहे.शुभम शिंदे हा पाणी पुरवठा विभागात शासकीय अभियंता म्हणून कार्यरत आहे.तर सुषमाने नुकताच भारती विद्यापीठ पुणे येथून एमएससी इन ह्यूमन ॲनाटोमीच शिक्षण घेतल आहे.दोन्ही नवविवाहित वधूवर हे उच्च विद्या विभूषित आहेत.सोलापुरातील जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात हा विवाह अगदी साध्या पद्धतीने पार पडला.या साध्या विवाहला दोन्ही परिवारातील निवडक नातेवाईक आणि मित्र परिवार उपस्थित होते.दरम्यान या विवाहचा खर्च टाळून साधारण 25 ते 30 लाख रुपये हे विनाअनुदानित शिक्षकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून देण्याचा निर्णय नवविवाहित दांपत्याने घेतला आहे.’सावंत-शिंदे’ परिवाराने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वच स्थरातून कौतुक होत आहे.



