सोलापूर बातमीमहाराष्ट्रशैक्षणिकसोलापूर सामाजिक

राष्ट्रीय गणित दिनानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील संगणकशास्त्र संकुलात विविध स्पर्धांचे अयोजन…

राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग महाराष्ट्र राज्य आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने गणित विभाग, संगणकशास्त्र संकुलामध्ये दि. 6 आणि 7 फेब्रुवारी दरम्यान गणित विषयक विविध कार्यक्रमांचे आयोजन करून राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
गणित या विषयात मुलांना आवड निर्माण व्हावी व भविष्यात उत्तम शिक्षक आणि संशोधक विद्यार्थी निर्माण व्हावेत या उद्देशाने सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राज्यातील विविध महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी अभियोग्यता चाचणी, भित्तीपत्रके प्रदर्शन स्पर्धा, तसेच पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा इत्यादींचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी विद्यापीठ परिसर व विद्यापीठ परिसराबाहेरून हि मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला होता. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून एकूण 183 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
6 फेब्रुवारी रोजी सकाळी तिन्ही स्पर्धेचे उद्घाटन विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांच्या हस्ते करण्यात आले व त्यानंतर पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी अभियोग्यता चाचणी घेण्यात आली. अभियोग्यता चाचणी नंतर भित्तीपत्रके प्रदर्शन स्पर्धा तसेच पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने प्रथम क्रमांक व तृतीय क्रमांक आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठने द्वितीय क्रमांक पटकाविला.
भास्कराचार्य भित्तीपत्रक प्रदर्शन स्पर्धा पदवी विभागामध्ये नातू विश्वजीत तानाजी, दयानंद सायन्स कॉलेज, लातूर व कदम श्रद्धा शिवाजी, महात्मा गांधी कॉलेज, अहमदनगर यांनी प्रथम क्रमांक, प्राप्ती नागेश निकम, वालचंद कॉलेज, सोलापूर व प्राजक्ता शिवाजी गायकवाड, डी.बी.एफ. दयानंद कॉलेज, सोलापूर यांनी द्वितीय तसेच वाघमारे प्रथमेश बंडू, डी.एस.जी. कॉलेज, मोहोळ याने तृतीय क्रमांक पटकाविला तर पंचांगे अंजली संतोश, डी.एस.जी. कॉलेज,मोहोळ या विद्यार्थीनीने उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला. तर भास्कराचार्य भित्तीपत्रक प्रदर्शन स्पर्धा पदव्युत्तर विभागामध्ये कदम आकांक्षा हरीषचंद्र, एस.आर.टी. एम. विद्यापीठ, नांदेड या विद्यार्थीनीने प्रथम क्रमांक, पवार अंजली महादेव, पु.अ.हो.सोलापूर विद्यापीठ हीने द्वितीय क्रमांक, बिराजदार अमृता वैजनाथ व राठोड विद्या विलास, पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठ या विद्यार्थीनींनी तृतीय क्रमांक तर पाटील अर्शिया फैयाज, के.बी.पी. कॉलेज, पंढरपूर हीने उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला. या स्पर्धेसाठी लोणावळा येथील सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीरिंग चे दयानंद व्यवहारे, व MIT कॉलेज ऑफ रेलवे इंजिनीरिंग अँड रिसर्च, बार्शीचे चेतन अध्ये यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. अभियोग्यता चाचणी पदवी विभागामध्ये ऋषीकेश विष्णू फुगे, वालचंद कला व विज्ञान महाविद्यालय, सोलापूर याने प्रथम क्रमांक, नातू विश्वजीत तानाजी, दयानंद सायन्स कॉलेज, लातूर व डोंगरे तेजस्विनी केशव, के.बी.पी. कॉलेज, पंढरपूर या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक, मंगेश मनोज घोडके, श्री शिवाजी कॉलेज, बार्शी व हिरोळी विजयालक्ष्मी सूर्यकांत, सी.बी. खेडगी कॉलेज, अक्कलकोट यांनी तृतीय क्रमांक तर विनायक आदिनाथ चिवडे, महात्मा गांधी कॉलेज, अहमदपूर या विद्यर्थ्याने उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला. तर अभियोग्यता चाचणी पदव्युत्तर विभागामध्ये साठे निखिल सतीश, दयानंद कॉलेज, सोलापूर, कदम आदित्य अरविंद, एस.आर.टी.एम., नांदेड यांनी प्रथम क्रमांक, लक्ष्मी हिंगणगावकर पु.अ.हो.सोलापूर विद्यापीठ हीने द्वितीय क्रमांक, राठोड विद्या विलास, पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठ या विद्यार्थीनींने तृतीय क्रमांक तर पाटील अर्शिया फैयाज, के.बी.पी. कॉलेज, पंढरपूर हीने उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला.
या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांची प्रमुख उपस्थिती होती. सरांनी विद्यार्थ्यांना गणिताचे महत्व, फायदे व गणितातील संशोधन या विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात मिळालेल्या प्रतिसादाचे कौतुक केले. त्यानंतर त्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. या स्पर्धेसाठी संगणकशास्त्र संकुलाचे संचालक प्राध्यापक डॉ. राजीवकुमार मेंते व समन्वयक डॉ. सौ. ज्योती माशाळे तर चंद्रकांत गार्डी यांनी खजिनदार म्हणून काम पाहिले. समारोप कार्यक्रम प्रसंगी गणित विभागाच्या महिमा जगले यांनी सूत्रसंचालनाचे काम पाहिले तसेच विशाल कोळी सरांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगणकशास्त्र संकुलातील प्राध्यापक, डॉ. अशोक शिंदे, डॉ. श्रीराम राऊत, विशाल कोळी, अंजली वलेकर, महिमा जगले, संकुलातील इतर सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, संशोधक विद्यार्थी व पदव्युत्तर विध्यार्थ्यानी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login