सोलापूर क्राईम

सोलापूरात या दोन सावकारांची निर्दोष मुक्तता

सोलापूर दि:- महादेव गजेंद्र सुर्वे रा- आष्टी, ता मोहोळ जि सोलापूर यांस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १.उमेश उत्तरेश्वर सुर्वे वय-४१, २. शिवाजी नामदेव सुर्वे, वय- 38, रा- बैरागवाडी, ता-माढा, जि- सोलापूर यांच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांच्यासमोर होऊन त्यांनी निर्दोष मुक्तता केली.
यात हकीकत अशी की, मयत महादेव याने मुलगा योगेश व मुलगी अनुराधा यांच्या लग्नासाठी सन 2011 साली आरोपी उमेश सुर्वे याच्याकडून तीन लाख व दुसरा आरोपी शिवाजी सुर्वे याचे कडून दीड लाख रुपये तीन टक्के व्याजाने घेतले होते. मयत महादेव याने दोघांचे पैसे देण्याकरिता त्याची एक एकर जमीन सन 2014 साली राहुल डोके यास विकून दोन्ही आरोपींचे व्याजासहित पैसे मयत महादेव याने परत केले होते. दोन्ही आरोपी हे घटने आधी आठ ते दहा दिवसांपूर्वी मयत महादेव यास व्याजाचे 18 लाख रुपये झाले आहेत, ते द्या नाहीतर तुमच्या जमिनीवर कब्जा करतो, अशी धमकी देत होते व तशी फोनवर देखील धमकी देत होते. दिनांक 9/3/2021 रोजी दोन्ही आरोपींच्या त्रासाला कंटाळून महादेव याने गळफास घेऊन आत्महत्या केली व तशी चिठ्ठी देखील मययाने लिहून ठेवली होती. अशा आशयाची फिर्याद मयताचा मुलगा गणेश महादेव सुर्वे याने मोहोळ पोलीस ठाण्यात दिली होती.
त्यावरून पोलिसांनी तपास करून न्यायालयात आरोपी विरुद्ध दोषारोप पत्रक दाखल केले होते.

सदर खटल्यात एकंदरीत सहा साक्षीदार तपासण्यात आले.

खटल्याच्या सुनावणीच्या वेळी ऍड.मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तीवादात, आरोपींना मयताने विकलेली जमीन परत मिळण्यासाठी मयताच्या मृत्यूचा गैरफायदा घेऊन खटला दाखल केल्याचा युक्तिवाद केला त्यावरून न्यायाधीशांनी दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

यात आरोपीतर्फे ॲड मिलिंद थोबडे, ॲड. सत्यवान सुर्वे (माढा), ॲड सतीश शेटे तर सरकार तर्फे ॲड. ए व्ही नरखेडकर यांनी काम पाहिले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login