सोलापूर बातमीsolapurpoliceक्राईममहाराष्ट्रसोलापूर क्राईमसोलापूर धार्मिक

सोलापूर पोलिसांचा २००० KM सर्जिकल स्ट्राईक! नराधम गुजरातच्या बिळातून उचलला..!

सोलापूर – अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने २ हजार किलोमीटर अंतर पार करत अल्पवयीन बालिकेला पळवून नेणाऱ्या आरोपीला गुजरातमधून ताब्यात घेतले आहे. पीडित बालिकेचीही सुटका करण्यात आली आहे.गुन्ह्याची माहिती –
– गुन्हा : सदर बझार पोलीस ठाणे गु.र.नं. १००३/२०२४ – BNS कलम १३७(२), १४३
– आरोपी : ओम संजय साळके
– पीडित : अल्पवयीन बालिका
– आरोपी व पीडित मिळाल्याचे ठिकाण : भाईपुरा हटकेश्वर, सुशिला बेणी चाळ, अहमदाबाद, राज्य गुजरात

काय घडले होते?

सदर बझार पोलीस ठाण्यात दि. २५/१२/२०२४ रोजी गुन्हा दाखल होता. आरोपी ओम संजय साळके याने अल्पवयीन बालिकेस काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले होते.

सदर बझार पोलीस ठाणेकडील तत्कालीन तपासी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करून देखील आरोपी व पीडित बालिकेचा शोध लागत नव्हता. त्यामुळे सदरचा गुन्हा हा पुढील तपासकामी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, सोलापूर शहर येथे दि. २९/०८/२०२५ रोजी वर्ग करण्यात आला होता.

गुन्हा वर्ग होताच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडील तपासी अधिकारी व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार यांनी कौशल्यपूर्वक तपास करून व तांत्रिक माहिती प्राप्त करून आरोपीचा ठावठिकाणा शोधला.

दि. ०४/०९/२०२६ रोजी पहाटे २.२० वाजता अहमदाबाद, राज्य गुजरात येथील भाईपुरा हटकेश्वर, सुशिला बेणी चाळी येथून आरोपी व अल्पवयीन बालिका यांना ताब्यात घेण्यात आले. पुढील कार्यवाही करीता दि. ०७/०९/२०२६ रोजी त्यांना सदर बझार पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे.

कामगिरी करणारे पथक –

पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) डॉ. अश्विनी पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस निरीक्षक श्रीमती स्नेहा म्हेटर, ग्रेडपोसई/अलका शहापुरे, पोना/७०० अ. सत्तार पटेल, चालक पोशि/७२४ दादा गोरे तसेच सायबर पोलीस ठाणे कडील पोह/६०९ प्रकाश गायकवाड, पोह/२०८ मच्छिंद्र राठोड यांनी उत्कृष्ट व शिताफीने कामगिरी करून ही कारवाई केली आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel