सोलापूर बातमीक्राईमसोलापूर क्राईम

सोलापूर ब्रेकिंग : जागेच्या वादातून पंजाब तालीम येथे मर्डर…

पंजाब तालीम येथे जागेच्या वादातून झालेल्या भांडणात एका भावाचा खून झाल्याची घटना समोर आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की आज दिनांक नऊ ऑक्टोबर 2024 रोजी राहत्या घरात जागेच्या झालेल्या वादातून समीर गुल हमीद शेख, साबीर शेख , साकिब व इतर दोन ते तीन जणांनी मिळून लाकडाने व लोखंडी मारहाण केल्याने त्या मारहाणीत शाकीर गुलहमीत शेख वय वर्ष 46 व शहाजान गुलमीत शेख वय वर्ष 51 हे दोघे जखमी झाले होते.

या मारहाणीत डोक्यात जखमे उजव्या हातात मुक्कामार व सर्व अंगास मुक्कामार लागल्याने व शहाजान शेख यांना यास पाठीवर मुक्कामार सर्व अंगास मुक्कामार लागल्याने उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थाची हॉस्पिटल या ठिकाणी मुलगा शाहिद शेख यांनी दाखल केले होते.

मात्र तेथून पुढील उपचारासाठी ते एका खाजगी दवाखान्यात दाखल झाले.
यामध्ये शहाजान गुलहमीत शेख वय वर्ष 51 राहणार 496 उत्तर कसबा सोलापूर यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शहाजान शेख हे परगावी राहत असून आपल्या कुटुंबात लग्न असल्याने ते सोलापुरात आले होते.

सोलापुरात भावाभावा मध्ये झालेल्या जागेच्या वादातून मारहाण झाली व त्या मारहाणीत शहाजान गुलहमीत शेख त्यांचा मृत्यू झाला.

सदर याबाबत अधिक माहिती नातेवाईकांनी माध्यमांशी बोलताना दिली

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel