सोलापूर महापालिकेत मनीष भैय्या केत यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून वर्णी लागणार….

भाजप कडून पत्रकार प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांची सोलापूर महापालिका स्वीकृत नगरसेवकपदी लागणार वर्णी….
सोलापूर महानगरपालिका स्वीकृत सदस्य निवड प्रक्रिया 20 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये होणार आहे नऊ जागांसाठी तब्बल 62 इच्छुकांनी महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती जवळपास निश्चित झाली आहे यांची फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी अहोरात्र घेतले कष्ट त्याचबरोबर पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार विजय देशमुख, सुभाष देशमुख देवेंद्र कोठे यांच्याशी असलेले सलोख्याचे संबंध त्यामुळे त्यांच्या नावाला सर्वांनीच ग्रीन सिग्नल दिलेला आहे सर्व पक्ष्यातील नेते मंडळीशी असलेले संबंध व पत्रकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी असलेली तळमळ व शहर विकासाचे व्हिजन घेऊन ते पुढे निघालेले आहेत त्यामुळे सोलापूर महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांची वर्णी जवळपास निश्चित मानली जात आहे…



