सोलापूर क्राईममहाराष्ट्रसोलापूर बातमी

सोलापूर : “रात्री इथे कसा आलास?” विचारले म्हणून अनोळखी इसमाची मारहाण, एकाचा दात तुटला…

पंजवानी मार्केटजवळ रात्रीच्या वेळी शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाला “रात्री इथे कसा आलास?” असे विचारल्याच्या कारणावरून शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. मारहाणीत फिर्यादीचा एक दात तुटला असून हाताला व शरीरावर गंभीर दुखापत झाली आहे.

कुठे व कधी घडली घटना?
दि. 31/05/2026 रोजी रात्री 10.00 वा. च्या सुमारास पंजवानी मार्केट जवळ, सोलापूर येथे ही घटना घडली.

काय घडले?
फिर्यादी बसवराज शिवपुत्र इंडे, वय 84, रा. अंबिका नगर हे पंजवानी मार्केटजवळ बसले होते. त्यावेळी एक अनोळखी इसम येऊन त्यांच्या शेजारी बसला. बसवराज यांनी त्याला “तू रात्री आत कसा आला?” असे विचारले. या कारणावरून संतापलेल्या अनोळखी इसमाने फिर्यादीला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली.

दुखापतीचे स्वरूप
मारहाणीत फिर्यादीचा एक दात तुटला. तसेच उजव्या हाताचे मनगटाजवळ, छातीला व पाठीवर मार लागल्याने गंभीर दुखापत झाली आहे.

गुन्हा दाखल
याप्रकरणी बसवराज इंडे यांनी दि. 01/06/2026 रोजी रात्री 11.09 वा. एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी भा.न्याय संहिता कलम 117(2), 125(अ), 352, 351(2) प्रमाणे गु.र.नं 558/2026 नुसार अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोहेकॉ/745 डोके – 9823813031 तपास करीत आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel