सोलापूर :राम सातपुते यांचेवर कारवाई करा…पहा कोणी केली मागणी
राम विठ्ठल सातपुते हे भारतीय जनता पार्टी तर्फे सोलापूर लोकसभा मतदार संघामध्ये खासदार या पदाकरीता उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. दि.२१/०४/२०२४ रोजी त्यांनी सोशल मिडीयावर मुलाखत देताना मुस्लिम समाजातील धर्मगुरु मुफ्ती, मौलवी यांच्याविषयी चुकीचे विधान केलेले आहे. जे मुस्लिम समाजातील कार्यकर्ते काँग्रेसमध्ये सोबत आहेत त्या सर्व कार्यकार्त्यांना राम विठ्ठल सातपुते यांना जिहादी लोक म्हणून हिणवले आहे.तसेच मुस्लिम समाजातील मुफ्ती, मौलवी व धर्मगुरु हे मस्जिदमधून बसुन भारतीय जनता पार्टीला मतदान करु नका व काँग्रेसला मतदान करा असे फतवे देत असल्याचे चुकीचे विधान केलेले आहे. तसेच मुस्लिम समाजाबाबत राम विठ्ठल सातपुते हे वेळोवेळी द्वेषयुक्त विधान करुन मुस्लिम समाजामध्ये भितीचे वातावरण निर्माण करु पाहत आहेत. राम विठ्ठल सातपुते हे करीत असलेल्या विधानामुळे मुस्लिम समाजातील लोक मतदान करण्यास देखील येण्यास भित आहेत. एकुणच राम सातपुते हे मुस्लिम समाजाविषयी, मुस्लिम समाजातील मौलवी विषयी, मुस्लिम समाजातील मुफ्ती विषयी तसेच मुस्लिम समाजातील धर्मगुरु विषयी व मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळ मस्जिद विषयी चुकीचे व बेकायदेशीर विधान करुन दोन समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करु पाहत आहेत. त्यामुळे त्यांच्या विरुध्द चौकशी होवुन कारवाई होणे गरजेचे आहे.
मुस्लिम समाजातील मुफ्ती, मौलवी व धर्मगुरु तसेच मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळ मस्जिद विषयी चुकीचे व बेकायदेशीर विधान करुन दोन समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणारे राम विठ्ठल सातपुते यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी