सोलापूर बातमीखेळ

सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने CP चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या 32 व्या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने मा. एम. राजकुमार सो. पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 09/08/2024 ते 11/08/2024 रोजी दरम्यान पोलीस कमिशनर ट्रॉफी CP चषक क्रिकेट स्पर्धा पोलीस मुख्यालय, सोलापूर येथे आयोजित करण्यात आली होती सदर स्पर्धेमध्ये सर्व पोलीस स्टेशन, गुन्हे शाखा, मुख्यालय, क्यूआरटी पथक, वाहतूक शाखा, पोलीस आयुक्त कार्यालय टीम यांच्या एकूण 12 टीम नी सहभाग नोंदविला होता. सदर 12 टीमचे ए बी सी डी असे चार गटामध्ये वर्गीकरण करण्यात आले होते.
दि. 09/08/2024 रोजी स्पर्धेचे उद्घाटन हे मा. विजय कबाडे सो. पोलीस उपायुक्त परिमंडळ व मा. अजित बोऱ्हाडे सो. पोलीस उप आयुक्त मुख्यालय यांच्या हस्ते झाले होते, तर उदघाटनाचा सामना हा जेलरोड पोलीस स्टेशन व पोलीस आयुक्त कार्यालय टीम यांच्यामध्ये झाला होता.
मागील दोन दिवसांमध्ये साखळी गटाचे सामने होऊन सेमी फायनल मध्ये चार संघ आले होते. त्यामध्ये आज दिनांक. 11/08/2024 रोजी सेमी फायनल चा पहिला सामना क्यू आर टी पथक व जेलरोड पोलीस स्टेशन यांच्यामध्ये होऊन सदर सामना हा जेलरोड पोलीस स्टेशन ने जिंकून फायनल मध्ये गेले तर दुसरा सेमी फायनल सामना हा एमआयडीसी पोलीस स्टेशन व गुन्हे शाखा यांच्यामध्ये होऊन सदर सामना हा एमआयडीसी पोलीस स्टेशन ने जिंकला व फायनल मध्ये गेले. फायनलच्या मॅच साठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. एम. राजकुमार सो. पोलीस आयुक्त सोलापूर व मा. विजय कबाडे सो. पोलीस उपायुक्त परिमंडळ तसेच क्राईम सहाय्यक आयुक्त श्री राजन माने सो. व महाराष्ट्र रणजी संघाचे कोच मा.सुलक्षण कुलकर्णी,
महाराष्ट्र रणजी पट्टू महाराष्ट्र निवड समितीचे सदस्य रोहित जाधव सर, अंडर 19 भारतीय संघाचा व आयपीएल खेळाडू अर्शीन कुलकर्णी, अंडर 19 भारतीय संघाचा खेळाडू सचिन धस, महाराष्ट्र अंडर 16 कॅप्टन अथर्व काळे यांच्या उपस्थितीमध्ये अंतिम सामना झाला.
अंतिम सामन्या मध्ये जेलरोड पोलीस स्टेशन यांनी नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला व 8 षटकात 4 बाद 98 धावा केल्या यामध्ये वसंत माने 42 धावा , विनोद दांडगे 25 धावा , हरीश पवार 20 धावा केल्या. गोलंदाजी मध्ये एमआयडीसी संघाकडून राजपाल सर्ववदे,प्रवीण वाघमारे,महेश आरकाल यांनी प्रत्येकी 1 खेळाडू बाद केले.
या धावसंख्येचा पाठलाग करताना एमआयडीसी पोलीस ठाणे संघाने 7.4 षटकात 4 बाद 99 धावा करून विजय मिळवला. एमआयडीसी पोलीस ठाणे संघाकडून फलंदाजी मध्ये महेश आरकाल नाबाद 58 धावा, प्रशांत सुरवसे 18 धावा, सुहास अर्जुन नाबाद 13 धावा केल्या गोलंदाजी मध्ये जेलरोड पोलीस ठाणे संघाकडून मनोज मोरे 3 व हर्षद मुजावर 1 खेळाडू बाद केला हा सामना एमआयडीसी पोलीस ठाणे संघाने सहा गडी व 2 चेंडू राखून सामना जिंकला आणि पोलीस कमिशनर ट्रॉफी CP चषक स्पर्धा सलग तिसऱ्यांदा जिंकली. तसेच स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते झाले. अंतिम सामन्यातील सामानवीर व
उत्कृष्ट फलंदाज महेश आरकाल 174 धावा
स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज मनोज मोरे 7 विकेट
मालिकावीर राजू चव्हाण 105 धावा व 5 विकेट
यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी माननीय श्री राजन माने साहेब (क्राइम ACP)
विष्णू गायकवाड साहेब(API)
निलेश सोनवणे सर ( API)
मुकेश गायकवाड सर (PSI)
व महेश आरकाल. नागेश गुळवे यांनी अथक परिश्रम घेतले
या स्पर्धेसाठी पंच म्हणून चंद्रकांत मंजेली . अशोक डोंबाळे.
गुणलेखक दत्ता बडगु
समालोचक म्हणून शंकर पवार नागप्‍पा कोप्पा यांनी काम पाहिले*

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login