सोलापूर अपघातसोलापूर बातमी

सोलापूर : हैदराबाद रोडवर भीषण अपघात, महिलेचा मृत्यू, पती गंभीर जखमी….

सोलापूर शहरातील हैदराबाद रोड, चंदन काटा येथे आज भीषण अपघाताची घटना घडली. एसटी बस आणि दुचाकीच्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

मृत महिलेचे नाव शाहेनाज महेबुब शेख (वय 34, रा. कुंभारी, दक्षिण सोलापूर) असे आहे, तर तिचे पती महेबुब नबिलाल शेख (वय 38, रा. कुंभारी, दक्षिण सोलापूर) हे गंभीर जखमी झाले आहेत. प्राप्त माहितीनुसार, हे दांपत्य तांदुळवाडी येथील नातेवाईकांच्या लग्नातून परतत असताना हैदराबाद रोड, चंदन काटा येथे हा अपघात घडला.

मयत शाहेनाज यांच्या पश्चात आई, पती, मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे. जखमी महेबुब यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login