सोलापूर बातमीदेश - विदेशमहाराष्ट्रसोलापूर धार्मिकसोलापूर सामाजिक

गोविंदराज नगर येथे प्रभू श्रीरामाच्या मूर्ती प्रतिष्ठानेच्या वर्षपूर्तीनिमित्त दिपोत्सव व श्रीरामपुजेचे आयोजन…

अयोध्या येथील प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना गेल्या वर्षी मोठ्या धार्मिक वातावरणात संपन्न झाले.या रामलल्लांचं प्रतिकृती व गांभाऱ्याचे सजावट गोविंदराज नगर गणेशोत्सव मंडळ विडी घरकुल च्यावतीने करण्यात आला. प्रभू श्रीरामाच्या मूर्ती प्रतिष्ठानेच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित दिपोत्सवाचे उद्धाटन आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आला.आमदार देशमुख यांनी यावेळी वर्षपूर्तीनिमित्त सर्व परिसरातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या.यावेळी मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण अवधूत यांच्या हस्ते देशमुख मालकांचा पुष्पहार व शाल आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी सचिव व्यंकटेश दोंता यांनी गोविंदराज नगर व भाग्यनगर मधील मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांची व्यथा मांडली यावेळी तात्काळ माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख मालक यांनी ह्या भागातील रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे वचन दिले.या दिपोत्सव कार्यक्रमासाठी डॉ माकम ग्रस्ट्रो क्लिनिकचे संचालक डॉ श्रीकांत माकम यांची विशेष उपस्थिती होती.यावेळी त्यांनी मंडळाच्यावतीने कार्यक्रम पाहून हिंदू सणातील महत्वाचे सण उत्सव लुप्त होत आहेत अशा कार्यक्रमातून पुढच्या युवा पिढीला आपल्या संस्कृतीबद्दलचे महत्त्व कळून चुकेल अशी आशा व्यक्त केली.याचवेळी गोविंदराज नगर गणेशोत्सव मंडळाच्या महिला मंडळाच्या वतीने हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित केला.महिलांनी यावेळी दिपोत्सव व रांगोळी काढून परिसराची शोभा वाढवली.प्रभू श्रीरामाच्या सजावटीसाठी उमेश गायकवाड, रोहित संगा, आदित्य दुडम यांनी परिश्रम घेतले.
यावेळी अध्यक्ष बाळकृष्ण अवधूत, सचिव व्यंकटेश दोंता,शंकर श्रीकोंडा, चक्रधर अन्नलदास,उमेश गायकवाड, अनिल गोसकी, हिरालाल माकम, प्रमोद मार्गम, अनिल गोसकी, गोविंद गाजूल, व्यंकटेश कारमपुरी,बालकिसन गुंडला, अंबादास संगा,मार्गम काका, श्रीनिवास अरकाल, राजेश मामडयाल,तुळशीदास वाझंरे,बाबानगरे, कृष्णाहरी कस्सा, बाळकृष्ण म्याडम, इंदापूरे, सुशांत शेंडगे,विनायक ताला,नयन दोंता,तेजस मामडयाल, पोबत्ती यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी महिला मंडळाचे पदाधिकारी सौ कला चन्नापट्टण,सौ.उमा दोंता,सौ तृप्ती मामडयाल,सौ.सरिता अवधूत,सौ.हर्षदा वाझरे.
सौ.अमृतागाजूल,सौ.राधिका गोसकी,
सौ.उमा श्रीकोंडा,सौ.सुनंदा माकम,सौ.पार्वती अन्नलदास सौ.पुष्पा कारमपुरी,सौ.कल्पना गायकवाड ,सौ.निशाली मार्गम,सौ.अनिता अरकाल यांच्यासह अनेक महिला भगिनी यावेळी उपस्थित होत्या.यावेळी हळदी कुंकू आणि वाण देण्याचा कार्यक्रम पार पडला.
याप्रसंगी अद्वैत सिध्दांत आत्मानंद पीठ सीतमच्या महिला मंडळींकडून श्रीराम विधानम श्रीराम पुजेचे आयोजन करण्यात आले.पुजेनंतर भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आलं.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login