महाराष्ट्र

मॉस्किटो कॉइलमुळे एकाच कुटुंबातील 6 सदस्यांचा मृत्यू…

राजधानी हादरली दिल्लीत मच्छर मारणाऱ्या कॉइलमुळे एकाच कुटुंबातील 6 जणांचा बळी गेला आहे. दिल्लीच्या शास्त्री पार्क भागात ही घटना घडली आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, हे कुटुंब रात्री कॉइल लावून झोपी गेले होते. मध्यरात्री केव्हातरी या कॉइलमुळे उशी पेटली. त्यात 2 जण जागीच होरपळले. तर 4 जणांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. या घटनेत अन्य 2 जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर लगतच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांचीही प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

पोलिसांच्या माहितीनुसार, एका घरातील अनेक सदस्य बेशुद्ध पडल्याची खबर मिळाली होती. आम्ही घटनास्थळी जाऊन सर्वच सदस्यांना रुग्णालयात पाठवले. तिथे डॉक्टरांनी 8 पैकी 6 सदस्यांना मृत घोषित केले. सध्या पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनाला पाठवून तपास सुरू केला आहे. मृतांत 4 पुरुष, 1 महिला व एका दीड वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.

कॉइल लावून झोपणे धोकादायक

मच्छर मारणाऱ्या कॉइलमध्ये डीडीटी, अन्य कार्बन फॉस्फोरस व प्राणघातक तत्व असतात. बंद खोलीत मॉस्किटो कॉइल लावून झोपल्यास खोलीतील गॅस बाहेर जात नाही. यामुळे संपूर्ण खोलीत प्राणघातक कार्बन मोनोक्साईड भरतो. तसेच खोलीतील प्राणवायूचे प्रमाणही हळूहळू कमी होते.

माणसाच्या शरीरात ऑक्सिजनच्या जागी हळूहळू कार्बन मोनोक्साईडचे प्रमाण वाढते. यामुळे श्वास घेम्यास त्रास होऊन गुदमरून मृत्यू होण्याची शक्यता वाढते. एका संशोधनानुसार, 1 कॉइल 100 सिगारेट्सएवढी धोकादायक असते. त्यात जवळपास पीएम 2.5 दूर निघतो. हा धूर शरीरासाठी अत्यंत अपायकारक असतो.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel