महाराष्ट्र

पोलिसांकडून 40 लाख रुपये किमतीची ब्राऊन शुगर जप्त

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक -दोन यांनी कोंढवा परिसरात पेट्रोलिंग दरम्यान कारवाई करत, एका इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडून ४० लाख ते ३३ हजार रुपये किमतीचे ब्राऊन शुगर उर्फ हेरोईन जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील थोपटे यांनी गुरुवारी दिली आहे. याप्रकरणी शाहिद अख्तर हुसेन शेख (वय -49 ,रा. कोंढवा, पुणे )यास अटक करण्यात आलेली आहे.

अमली पदार्थ विरोधी पथक कोंढवा परिसरात पेट्रोलिंग करत असताना, पोलिस अमलदार चेतन गायकवाड यांना मिळालेल्या माहितीनुसार, शाहीर शेख हा ब्राऊन शुगर हा अमली पदार्थ त्याच्या ओळखीच्या लोकांना विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अमली विरोधी पथकाने सदर ठिकाणी जाऊन खातरजमा करत, शाहिद शेख यास अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून ३३६.१ ग्रॅम वजनाचे ४० लाख ३३ हजार २०० रुपये किमतीची ब्राऊन शुगर आणि दहा हजार रुपयांचा मोबाईल व रोख १६०० रुपये असा 40 लाख 44 हजार ८००रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

त्याच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई करीता आरोपीस कोंढवा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे ,पोलीस उपयुक्त अमोल झेंडे ,सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील थोपटे ,पोलीस उपनिरीक्षक एस घुले ,पोलिस हवलदार चेतन गायकवाड ,महिला पोलीस नाईक दिशा खेवळकर यांनी केली आहे.

साडेपाच लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त

गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी एकचे पोलीस नाईक विशाल शिंदे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कोंढवा परिसरात कौसर बाग रस्त्यावर प्रवीण सुपर मार्केट या दुकानात क्याथा इडूलीस खत अमली पदार्थ आणि शासनाने प्रतिबंधित केलेल्या विदेशी सिगरेट विक्री करत आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकून लक्ष्मण कोलाराम सिरवी (वय -34 ,मूळ.रा. सातला , जोधपुर ,राजस्थान) यास अटक केली आहे.

त्याच्या ताब्यातून एक लाख 13 हजार किमतीचे एक किलो ४२३ ग्रॅम अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. तसेच विदेशी कंपन्यांचे वैधानिक इशारा नसलेल्या एकूण चार लाख ३३ हजार रुपये किमतीच्या 886 सिगरेटची पाकीट असा एकूण पाच लाख 56 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील हे याबाबत पुढील तपास करत आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel