महाराष्ट्र

मध्य रेल्वे सोलापूर विभागात रेल्वे मार्गाचे शंभर टक्के विद्युतिकरण

सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात  एकूण ९७६ किलोमीटर अंतराच्या रेल्वेमार्गाच्या विद्युतिकरणाचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. शेवटच्या शिल्लक राहिलेल्या औसा रोड ते लातूर रोड या ५२ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचे विद्युतिकरण करण्यात आले आहे.

संपूर्ण रेल्वेमार्गाच्या विद्युतिकरणामुळे सोलापूर विभागाची ३११६  किलो लिटर डिझेलची म्हणजेच वार्षिक ३५ कोटी ४८ लाख रूपयांची बचत होणार आहे. ही बचत कुर्डूवाडी-लातूर विभागातील ८२६८ टन कार्बन फूटप्रिंटच्या बचतीशी बरोबर तुलना करणारी ठरली आहे. सोलापूर विभागात रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाचा पहिला टप्पा आॕगस्ट २०१४ मध्ये मनमाड-पुणतांबा-शिर्डी (साईनगर) या ७३ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाच्या विद्युतिकरणाने पूर्ण झाला होता. त्यानंतर आठ वर्षात उर्वरीत संपूर्ण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे.

विद्युतिकरणाचे  फायदे

* पर्यावरण अनुकूल वाहतुकीचे साधन

*आयात केलेल्या डिझेल इंधनावरील अवलंबित्व कमी होऊन परकीय चलनाची बचत होते आणि कार्बन फूटप्रिंट कमी होतात.

* रेल्वे परिचालनाचा खर्च कमी होतो. * कर्षण बदलामुळे होणारा अडथळा वा विलंब कमी करून विभागीय क्षमता वाढवते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel