महाराष्ट्र

ST Bus : एसटी बस चालकांसाठी नवी नियमावली, मोबाईलसह ‘या’ वस्तू वापरण्यास बंदी

वाहनांच्या वाढत्या अपघातामागे अनेकदा चालक मोबाईलवर बोलत असल्याचं किंवा मोबाईल वापरत असल्याचं कारण समोर आलं आहे. मोबाईलच्या वापरामुळे होत असलेले असे अपघात रोखण्यासाठी आता राज्य परिवहन महामंडळाने चालकांसाठी नवा नियम लागू केला आहे.

चालकांनी बस चालवताना मोबाईल वापरू नये असं परिपत्रक महामंडळाकडून काढण्यात आलं आहे. एखादा चालक जर मोबाईल वापरताना दिसला, आढळून आले तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही राज्य परिवहन महामंडळाने दिला आहे.

अलिकडच्या काळात राज्य परिवहन बसचालक गाडी चालवत असताना मोबाईल वापरत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. याबाबतचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने लोकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मोबाईल वापरू नये अशा वेळोवेळी सूचना दिल्यानंतरही असे प्रकार घडणे ही गंभीर बाब असल्याचं राज्य परिवहन महामंडळाने म्हटलं आहे.

मोटार वाहन कायद्यानुसार वाहन चालवताना मोबाईल वापरण्यास बंदी आहे. एसटी प्रवास हा सुरक्षित प्रवास म्हणून ओळखला जातो. हा दावा भक्कम करण्यासाठी चालकांनी वाहन चालवण्याचे नियम काटेकोरपणे पाळण्याची आवश्यकता आहे असंही राज्य परिवहन महामंडळाने म्हटलं.

वाहन चालवताना मोबाईलचा वापर करण्यास बंदी घातली आहे. चालकांकडे मोबाईल असल्यास तो वाहकाकडे द्यावा असंही सांगण्यात आलं आहे. विनावाहक गाडी असल्यास चालकांनी आपला मोबाईल बॅगमध्ये ठेवावा. फक्त मोबाईलच नव्हे तर हेडफोन आणि ब्लूटूथसुद्धा वापरू नये असे निर्देश परिपत्रकात देण्यात आले आहेत. बस चालकांना वाहन चालवताना मोबाईल वापरण्यास बंदी घातल्याने अपघात नियंत्रणास मदत होईल आणि तक्रारीला संधी मिळणार नाही अशी अपेक्षा व्यवस्थापकीय संचालकांनी व्यक्त केलीय.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel