महाराष्ट्र

भाजपसाठी धोक्याची घंटा ! आप – कॉंग्रेसमध्ये आघाडी.. ‘या’ कारणासाठी आले दोन्हही पक्ष एकत्र

वी दिल्ली – चंदीगडच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यात आघाडी झाली आहे. त्यानुसार आम आदमी पक्ष महापौरपदाची निवडणूक लढवणार असून उपमहापौरपदासाठी कॉंग्रेसला उमेदवारी दिली जाणार आहे.

 

कॉंग्रेस आणि आम आदमी पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपावर चर्चा करीत असताना हा निर्णय झाला आहे. येत्या १८ जानेवारीला चंदीगडच्या महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक होईल. या आघाडीमुळे त्यांना भाजपवर बाजी मारणे सोपे जाणार आहे.

३५ सदस्यांच्या चंदीगड महापालिकेत भाजपचे १४ नगरसेवक आहेत. पक्षाकडे एक पदसिद्ध सदस्य देखील आहे ज्यांना मतदानाचा अधिकार आहे. या महापालिकेत आम आदमी पक्षाचे १३ तर कॉंग्रेसचे सात नगरसेवक आहेत. त्यामुळे बहुमत या आघाडीकडे असणार आहे. शिरोमणी अकालीदलाचाही एक सदस्य या महापालिकेत आहे.

२०२२ आणि २०२३ मध्ये काँग्रेसने मतदानावर बहिष्कार घातल्याने महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचा विजय झाला होता. यंदाचे महापौरपद अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गासाठी राखीव झाले आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login