महाराष्ट्र

PM मोदी 3 दिवस कांबळ घेऊन चौकीत झोपणार, रामललाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी कठोर व्रत

योध्या : अयोध्येत रामललाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी आजपासून अनुष्ठान सुरू करण्यात आले आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.

यामुळे अयोध्येसह देशभरात उत्सवाचं वातावरण आहे. दरम्यान, शिल्पकार, मूर्तीकार राम मंदिर प्राण प्रतिष्ठेसाठी तयार करण्यासाठी झटत आहेत. मंगळवारापासून धार्मिक अनुष्ठानाला सुरुवात झालीय. दरम्यान, श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंददेव महाराज यांनी मोठी माहिती दिलीय. धार्मिक कार्यक्रमाच्या शेवटच्या तीन दिवसात पंतप्रधान मोदी हे चौकीवर फक्त कांबळ घेऊन झोपणार आहेत.

पंतप्रधान मोदी २२ जानेवारीला रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. त्यासाठी पंतप्रधान मोदींना कठोर असं धार्मिक अनुष्ठान आणि नियम पाळावे लागणार आहेत. गोविंददेव महाराज यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, शेवटच्या तीन दिवसात पंतप्रधान मोदी त्यांच्या चौकीवर फक्त कांबळ घेऊन झोपणार आहेत. या तीन दिवसात आहार म्हणून फक्त फळांचे सेवन करतील. पंतप्रधान मोदींनीच विचारलं होतं की, त्यांना काय करावं लागणार आहे. कितीही कठीण असलं तरी त्यासाठी मी तयार आहे असंही ते म्हणाले होते. पंतप्रधान मोदींना विशेष मंत्रांचा जप करायचा असून त्याचीही माहिती देण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदींकडून काही दानही केलं जाईल. त्यासोबतच भेटवस्तू दिल्या जातील. त्याचे पूजन करण्यात येईल. प्राण प्रतिष्ठेसाठी प्रमुख पाहुणे अनिल मिश्रा असतील. त्यांनाही काही धार्मिक अनुष्ठान करावे लागणार आहेत. मंदिर उभारणीसाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांचे प्रतीक म्हणून जटायूची मूर्तीही तयार करण्यात आली आहे. त्या मूर्तींचे पूजन पंतप्रधान मोदी करणार आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login