महाराष्ट्र

एवढी गर्दी, MIMचे खासदार जलील यांनी मनोज जरांगेंचं केलं कौतुक, PM मोदींना डिवचलं

विनाश कानडजे, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्र्यांच्या भाषणावरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी टीका केली. देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा त्यांनी दिल्या.

जलील म्हणाले की, पालकमंत्र्यांचे भाषण मी ऐकत होतो तेव्हा जे काय केलेला आहे आणि जे काय राहिलेला आहे ते सर्व सांगायला पाहिजे होतं. जलील यांनी यावेळी मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरही प्रतिक्रिया दिली. मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या भूमिकेवर त्यांनी निशाणा साधला.

खासदार जलील म्हणाले की, सरकारने मनोज जरांगे-पाटील आणि त्यांच्यासोबत लाखोच्या संख्येने येणाऱ्या नागरिकांना थांबवण्यासाठी सर्वकाही प्रयत्न केले . त्याचाच प्रकार म्हणून मीरा भाईंदर पासून मुंबईमध्ये दंगल घडू शकतो का? जरांगे पाटील यांनी सर्वसामान्य माणसाची ताकद दाखवून दिली आहे. मी चॅलेंज करतो की, नरेंद्र मोदीपासून भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते महाराष्ट्रमध्ये आले तरी मनोज जरांगे पाटील एवढी गर्दी करण्याची ताकद नाहीये. जेवढी गर्दी मनोज जरांगे पाटील यांनी जमून दाखवली आहे असंही खासदार इम्तियाज जलील म्हणाले.

अनेक वर्षापासूनची मागणी आहे. पुढच्या महिन्यात आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे वेळ मारूपणा सुरू आहे. मग पुन्हा सांगायला आमच्या सरकार आल्यास आम्ही आरक्षण देऊ. त्यामुळे वेळ काढू पण सध्या सुरू आहे. समाजाला उल्लू बनविण्याचा धंदा सरकार करीत असल्याचं म्हणत त्यांनी टीकाही केलीय.

पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यावर टीका करताना जलील म्हणाले की, मोदींनी सांगितलं होतं मार्च 2022 पर्यंत बेघरांना घर मिळणार. मात्र पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात एकही बेघरांना घर मिळाले नाहीये. मग खोटं का बोलायचं. शहरात सात दिवसाला पाणी येतं याबाबत बोलायला पाहिजे होतं.. शेतकऱ्या आत्महत्या बद्दल बोलायला पाहिजे होतं. ही खरी परिस्थिती पालकमंत्र्यांनी भाषणात बोलायला पाहिजे होतं फक्त स्वतःची पाठ थोपवण्यामध्ये काय अर्थ आहे.. जर चांगलं काम केलं असतं तर या स्टेजवर उभा राहून मतदानाची भीक मागायची वेळ आली नसती. खऱ्या अर्थाने रामराज्य देशात तेव्हा येईल जेव्हा नरेंद्र मोदी आणि भाजपचे सरकार जाईल..

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login