महाराष्ट्रसोलापूर क्राईम

सोलापुरातून सुनिल अकोले ०२ वर्षाकरीता तडीपार

सोलापूर (प्रतिनिधि):- सोलापूर शहरातील MIDC  पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या इसम नामे, सुनिल लक्ष्मीकांत अकोले, वय-३३ वर्षे, रा. ४३, न्यु सुनिल नगर, एमआयडीसी, सोलापूर याचेविरुध्द सन २०१५ ते २०२३ या कालावधीमध्ये, मोटार सायकल चोरी करणे, महिलांच्या गळयातील मंगळसुत्र हिसकावून जबरी चोरी करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याचेविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता.

सदर प्रस्तावाचे अनुषंगाने श्री विजय कबाडे, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांनी कार्यवाही करुन, त्यांचेकडील तडीपार आदेश क्र. ७६४/२०२४ दि.२०/०३/२०२४ अन्वये, इसम नामे, सुनिल लक्ष्मीकांत अकोले, वय-३३ वर्षे, रा. ४३, न्यु सुनिल नगर, एमआयडीसी, सोलापूर यास सोलापूर जिल्हा व धाराशीव जिल्हा येथून दोन वर्षाकरीता दि.२२/०३/२०२४ पासून तडीपार केले आहे. त्यास तडीपार केल्यानंतर स्वारगेट, पुणे येथे सोडण्यात आलेले आहे

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel