क्राईममहाराष्ट्रसोलापूर क्राईमसोलापूर बातमी

ब्रेकिंग:- लखन गायकवाड मृत्यूप्रकरणी दोघा आरोपींवर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात 302 चा गुन्हा दाखल…

बार्शी रोडवर मित्रांनी मिळून मित्रालाच गुरुवारी अज्ञात कारणाने मारहाण केली असून यात तोडकर वस्ती येथील लखन गायकवाड या २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,यातील मयत युवकास मित्रांनी मिळून मागील भांडणाच्या कारणाने बार्शी रोडवरील एका स्थळी नेवून मारहाण केली. लखनला जबर मार लागला होता.यानंतर सदर मारहाण झाल्याची माहिती मयताच्या भावाला कळताच त्याने लखन यांस बाळे तोडकर वस्ती येथील घरी आणले. त्यावेळी त्याने जेवण करून झोपी गेले.काही वेळाने तो उठून आंग दुखू लागले असे सांगितला मात्र काही वेळातच लखनचा मृत्यू झाला.याबाबत फौजदार चावडी ठाणे पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ मारेकऱ्यांचा शोध सुरु केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयांमध्ये नेण्यात आले . या मध्ये मृत लखन ची आई अलका रघुनाथ गायकवाड यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर फौजदार चावडी पोलिसांनी आरोपी नागेश ज्ञानेश्वर कोळेकर रा. तोडकर वस्ती बाळे, आशुतोष उर्फ आवी राजू गाडेकर रा. मेंगाने नगर बाळे सोलापूर यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात भादवी कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल केला. याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बारावकर करीत आहेत .सध्या मारेकरी फरार आहेत….

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login