बेकायदेशीर पासिंग विलंब शुल्क अंमलबजावणी मागे घ्या अन्यथा तीव्र आंदोलन रियाज सय्यद यांचा इशारा

बेकायदेशीर पासिंग विलंब शुल्क अंमलबजावणी मागे घ्या अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा रियाज सय्यद यांनी मुंबई येथे झालेल्या परिवहनच्या बैठकीत दिला…
बुधवारी मुंबईच्या परिवहन कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी परिवहन आयुक्त विवेक भिमनराव,सह परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील, अति.सह आयुक्त कळसकर, कोठावले, पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांच्यासह वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना बेकायदेशीर पासिंग विलंब शुल्क अंमलबजावणी तत्काळ मागे घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा रियाज सय्यद यांनी दिला…
यावेळी वाहतूक संघटना संयुक्त महासंघ आणि आझाद रिक्षा संघटना,ऑटो रिक्षा, टॅक्सी संघटनेचे पदाधिकारी सदस्यांसह परिवहन विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते



