सोलापुरात महायुतीच्या वतीने शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टरला जोडे मार आंदोलन…

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो
जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही
या जित्या आव्हाडच करायच काय खाली डोक वर पाय
महायुतीचा विजय असो
अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला
प्रथमता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येतील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर
बुधवारी महाड येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला व अपनास्पद वर्तन केल या विरोधात सोलापुरात महायुतीच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टरला जोडेमार आंदोलन करून निषेध नोंदवला जितेंद्र आव्हाड यांना तातडीने अटक करा अशी मागणी करत घोषणाबाजी करण्यात आली.
या आंदोलनावेळी आमदार विजयकुमार देशमुख ,जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे,राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जुबेर बागवान राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आनंद चंदनशिवे डाॅ किरण देशमुख संजय कोळी राजकुमार पाटील अजित गायकवाड अविनाश पाटील गणेश पुजारी विशाल गायकवाड ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी,जनरल सेक्रटरी प्रमोद भोसले, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव,आनंद मुस्तारे बसवराज बगले ,आमिर शेख, राजू बेळेनवरू, शामराव गांगर्डे, रुपेश भोसले, पवन पाटील, नारायण माशाळकर, वैभव गंगणे ,सोमनाथ शिंदे ,विशाल बंगाळे, प्रज्ञासागर गायकवाड ,अनिल छत्रबंद, युवराज माने ,अविनाश भडकुंबे ,स्वप्निल पुजारी,यशराज डोळसे ,अजिंक्य उपिन, मैनुद्दीन शेख , दत्तात्रय बडगंची ,
महिला पदाधिकारी रोहीनी तडवळकर राष्ट्रवादी महिला समन्वयक शशिकला कस्पटे कांचन पवार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते .
आमदार विजयकुमार देशमुख यांनी जितेंद्र आव्हाडांवर जोरदार टीका करताना स्वतः ला बाबासाहेबांचे अनुयायी म्हणवणारे आव्हाडा यांच्या पोटात एक ओठात एक हे प्रत्यक्ष कालच्या वर्तनातून दाखवून दिले आहे. ते सतत महापुरुषांवर आणि हिंदू धर्मा बोलून अराजकता माजवत असतात अश्या आव्हाडाचा निषेध करतो अशी प्रतिक्रिया व्यक्त केली….
जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार
महाडच्या पवित्र भूमीत प्रसिद्धीच्या हव्यासापोटी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्टंटबाजी करत भारतरत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला या महाविकृत जितेंद्र आव्हाडचा राष्ट्रवादी आणि महायुतीच्या वतीने निषेध करतो डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण जगासाठी पुज्यनीय आहेत .
जितेंद्र आव्हाड यांच्या या वर्तनामुळे संपूर्ण राज्यात आणि देशात संतापाची लाट पसरली असून.यापूर्वी देखील मल्हारावजी होळकर व जगद्गुरु महात्मा बसवेश्वर यांच्यावर काही महिन्यापूर्वी अश्याच पद्धतीने अपमानास्पद वक्तृत्व केले होते.माफी मागणे आणि स्टंटबाजी साठी महापुरुषांवर जाणून बुजून टीका करणे हाच उद्योग जितेंद्र आव्हाड करत असतात.तरी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,अजित दादा पवार यांनी तात्काळ मानोविकृत जितेंद्र आव्हाड वर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अटक करावी अशी मागणी महायुतीच्या आंदोलनात संतोष पवार यांनी यावेळी केली.
भाजपा चे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी बोलताना सांगितल की जितेंद्र आव्हाड वारंवार असे कृत्य करीत असतो घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून जे कृत्य जितेंद्र आव्हाडांनी केली आहे त्याचा निषेध भाजपा आणि महायुतीच्या वतीने निषेध करतो जितेंद्र आव्हाडांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी केली
राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आनंद चंदनशिवे यांनी जितेंद्र आव्हाडांचा तीव्र शब्दात निषेध केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फङणवीस यांनी जितेंद्र आव्हाडांवर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा यापेक्षाही मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला ..



