थोर समाज सुधारक छत्रपती शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त श्री शिवजन्मोत्सव विद्यार्थी महामंडळाच्या वतीने अभिवादन…
छत्रपती शाहू महाराज यांची आज जयंती. त्यानिमित्त डाळिंब याड शिंदे चौक येथील श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या संपर्क कार्यालयात ट्रस्ट अध्यक्ष पद्माकर उर्फ नाना काळे यांच्या शुभहस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या फोटोस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
छत्रपती शाहू महाराज की जय घोषाने डाळिंबी आड परिसर दणाणून सोडला होता.
ट्रस्ट अध्यक्ष पद्माकर उर्फ नाना काळे यांनी आपल्या मनोगतात छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे मराठे राजघराण्यातील भोंसले घराण्याचे राजे आणि कोल्हापूर संस्थानचे महाराज होते. समाजसुधारक ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या योगदानाने खूप प्रभावित झाले होते. शाहू महाराज (Shahu Maharaj) हे एक आदर्श नेते आणि सक्षम शासक होते.
जयश्रीराव आणि राधाबाई यांच्या पोटी 26 जून 1874 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल गावातील घाटगे राजेशाही मराठा घराण्यात यशवंतराव घाटगे यांचा जन्म झाला. जयसिंगराव घाटगे हे गावप्रमुख होते, तर त्यांच्या पत्नी राधाभाई मुधोळच्या राजघराण्यातील होत्या. तरुण यशवंतरावांनी त्यांची आई केवळ तीन वर्षांची असताना गमावली. वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत त्यांचे शिक्षण वडिलांच्या देखरेखीखाली झाले. त्याच वर्षी, कोल्हापूर संस्थानातील राजा शिवाजी चौथा यांच्या विधवा राणी आनंदीबाई यांनी त्यांना दत्तक घेतले असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्ट अध्यक्ष पद्माकर नाना काळे ,राजन जाधव ,मतीन बागवान, श्रीकांत डांगे ,अंबादास शेळके ,प्रीतम परदेशी ,प्रकाश ननवरे ,लक्ष्मण महाडिक, विजय भोईटे ,बजरंग जाधव ,मोहनराव खामकर ,नितीन मोहिते, सचिन स्वामी सौरव कनेरी ,विनायक बजरंगी ,देविदास, घुले,नामदेव पवार इत्यादी उपस्थित होते.