स्थागुशा पोलीस निरीक्षक पदाच्या नियुक्तीसाठी पालकमंत्री तानाजी सावंत यांची पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना दमबाजी

पोलीस मुख्यालयातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी वासुदेव मोरे यांची नियुक्ती वशिल्याने झाल्याची बातमी धाराशिव लाइव्हने ५ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली होती. या बातमीला आता पृष्टी मिळाली आहे. पालकमंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना दमबाजी करून मोरेची ऑर्डर काढली आहे, हे आता समोर आले आहे. त्याचा व्हिडिओच धाराशिव लाइव्हच्या हाती लागला आहे.
पोलीस मुख्यालयातील स्थानिक गुन्हे शाखेच्या रिक्त झालेल्या पोलीस निरीक्षकपदी वासुदेव मोरे यांची ३ नोव्हेंबर नियुक्ती करण्यात आली आहे . मागील वर्षी निलंबित झालेल्या पोलीस निरीक्षकाच्या खांद्यावर स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी देण्यात आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. ही नियुक्ती वशिल्याने झाल्याची बातमी धाराशिव लाइव्हने दि. ५ नोव्हेंबर रोज्जी प्रसिद्ध केली होती. ही बातमी अखेर तंतोतंत खरी ठरली आहे.