आर्यन्स करिअर अकॅडमीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करून उजनी कॉलनी येथे कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले
कुमठा नाका येथील जनता सहकारी बँकेच्या मागे बटरफ्लाय स्कुलच्या बाजूला आर्यन्स करिअर अकॅडमीच्या कार्यालयाचे महानगरपालिका झोन ऑफिसर जगधाने साहेबांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. दैनिक लोकमत मधील अकॅडमीचे बॅनर मान्यवरांच्या हातात झळकत होते. त्यानंतर वैभव बनसोडे व सपना यमाजी या नुकत्याच भरती झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
आर्यन्स करिअर अकॅडमीचे अनेक विद्यार्थी पोलीस, रेल्वे, आर्मी, CRPF, SRPF, RPF, सहकार खाते, डिपार्टमेंटल PSI, राज्य उत्पादन शुल्क, विविध विद्यापीठे, लोहमार्ग पोलीस, अभियोक्ता कार्यालय, न्यायालयीन कर्मचारी, जलसंपदा, ST महामंडळ अशा विविध खात्यात भरती झाले आहेत.
पोलीस भरतीसाठी तंत्रशुद्ध पद्धतीने लेखी व मैदानी चाचणीची तयारी घेतली जाते, जेणेकरून विद्यार्थी मेरीटमध्ये बसला पाहिजे. सध्याच्या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी व नोकरी मिळवण्यासाठी तंत्रशुद्ध लेखी व फिजिकल तयारीचे मार्गदर्शन आवश्यक आहे आणि ते आर्यन्स करिअर अकॅडमी मध्ये मिळते.
फिजिकलची तयारी शास्त्रोक्त पद्धतीने घेऊन विद्यार्थ्यांची शारीरिक क्षमता वाढवली जाते.
मेरीट मिळवण्यासाठी गणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण व सामान्यज्ञान इत्यादी घटकांचे अचूक ज्ञान प्राप्त करणे आवश्यक असते. गणितातील विविध क्लृप्त्या, कमीतकमी वेळेत गणिते सोडवणे, विविध सूत्रे, पेपर कमी वेळेत कसा सोडवावा याचे तंत्र विद्यार्थ्यांना शिकवले जाते. अशी परिपूर्ण तयारी अकॅडमी मध्ये करून घेतली जाते. अमितकुमार अजनाळकर सर स्वतः विद्यार्थ्यांकडून आजपर्यंत तयारी करून घेत आलेले आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना मेरिटमध्ये येण्यास मदत होते.
आगामी 9000 पदांच्या पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी ऍडमिशन प्रक्रिया सुरू झाली असून पालकांनी व विद्यार्थ्यांनी कार्यालयात संपर्क साधावा व आगामी भरतीत आपले नाव मेरिटमध्ये कसे येईल याची तयारी करावी असे आवाहन अकॅडमीचे संचालक अमितकुमार अजनाळकर सरांनी केले.
या कार्यक्रमाप्रसंगी मोहसीन नेता शेख, ऍड अखिल शाक्य, ऍड दर्शना चक्रवर्ती, किर्तीपाल शिवशरण, बिभीषण यमगर, अक्षय गायकवाड, शशिकांत फडतरे, मारुती खरात, किशोर गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, सलमान कंपली, नौशाद शेख, जफी इनामदार, अशोक माहिमकर, शुभम भालेकर, आदित्य कांबळे आदी उपस्थित होते.