सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

लोहार समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध…आमदार विजयकुमार देशमुख

शहर उत्तर मतदार संघामध्ये लोहार समाज हा मोठ्या प्रमाणात वास्तव्य असून या समाजाला विकासात्मक असं आजपर्यंत काहीही मिळालेलं नाही. समाज मंदिर सुद्धा या समाजाच्या नावावरती नाही .त्यामुळे समाजाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून समाजाच्या सर्व अडचणी सोडवून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करेन असे मत शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केले.
लोहार समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विश्वकर्मा जयंती निमित्त पार्क चौक येथे आयोजित कार्यक्रमात आमदार देशमुख हे बोलत होते.
पुढे बोलताना आमदार देशमुख म्हणाले की,
श्री विश्वकर्मा पूजा दिवस हा हिंदू देव विश्वकर्मा, दैवी शिल्पकार यांच्यासाठी उत्सवाचा दिवस आहे. तो स्वयंभू आणि जगाचा निर्माता मानला जातो. त्याने द्वारका हे पवित्र शहर बांधले जेथे कृष्णाने राज्य केले, पांडवांची माया सभा, आणि देवांसाठी अनेक भव्य शस्त्रे तयार केली. त्यांना बिल्डर,अभियंता , शास्त्रज्ञ जगाच्या निर्मात्याला देव म्हणतात. यापैकी पाच शास्त्रज्ञ निर्माते झाले आणि अनेक शास्त्रज्ञ निर्माते झाले.
याचा उल्लेख ऋग्वेदात आहे, आणि त्याचे श्रेय स्टेप्त वेद, यांत्रिकी आणि वास्तुशास्त्राचे विज्ञान आहे. विश्वकर्माच्या विशेष प्रतिमा आणि प्रतिमा सामान्यतः प्रत्येक कामाच्या ठिकाणी आणि कारखान्यात स्थापित केल्या जातात. सर्व कामगार एका सामान्य ठिकाणी जमतात आणि पूजा करतात. विश्वकर्मा पूजेच्या तिसऱ्या दिवशी सर्वजण उत्साहात विश्वकर्माजींच्या मूर्तीचे विसर्जन करतात असे मतही त्यांनी व्यक्त केले.
यावेळी विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन आ .विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भीमाशंकर लोहार, बापूसाहेब अडसूळ ,कुमार अंकुश, नयना हरिहर, उत्सव अध्यक्ष सोमनाथ शिंदे , जेष्ठ पत्रकार रामलिंग कांबळे, उपाध्यक्ष अलोक कळसें, खजिनदार सोमनाथ सासने, मिरवणूक प्रमुख अभी टिंगरे, नाव्ही समाजाचे बापू काळे , गोसावी समाज अध्यक्ष नागेश गिरी, विश्वकर्मा संघटनेचे सुहास लोहार, उमेश टिंगरे, खजिनदार रामेश्वर कांबळे जिल्हाध्यक्ष बालाजी लोहार उपाध्यक्ष कमलाकर लोहार, सचिव विशाल कांबळे, पदाधिकारी सदस्य व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login