सोलापूर बातमीदेश - विदेशमहाराष्ट्रशैक्षणिकसोलापूर सामाजिक

सोलापूर विद्यापीठात शुक्रवारपासून रसायनशास्त्रावर आंतरराष्ट्रीय परिषद!

परदेशातील तीन तज्ञ महिला शास्त्रज्ञ येणार

दि. 5- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील रसायनशास्त्र संकुलाच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दि. 7 व 8 मार्च 2025 रोजी ‘भविष्यासाठी रसायनशास्त्र: शाश्वत उपायांसाठी पुढाकार’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून यासाठी परदेशातील तीन तज्ञ महिला प्राध्यापक प्रत्यक्ष उपस्थित राहणार असल्याची माहिती रसायनशास्त्र संकुलाच्या संचालिका डॉ. अंजना लावंड यांनी दिली.

या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. बाबासाहेब बंडगर यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्र-कलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, परिषदेचे समन्वयक डॉ. अनिल घनवट, सचिव डॉ. विकास कडू , डॉ. सदानंद शृंगारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

ही परिषद विज्ञान व शाश्वत विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून देश-विदेशातील नामवंत शास्त्रज्ञ आणि संशोधक यामध्ये सहभागी होणार आहेत. विशेषतः ८ मार्च, आंतरराष्ट्रीय महिला दिनाची सुवर्ण संधी साधत, या परिषदेमध्ये तीन प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय महिला वैज्ञानिक आपल्या व्याख्यानांद्वारे संशोधनातील नवीन दृष्टीकोन मांडणार आहेत. यामध्ये प्रा. अना रीटा सी. डुआर्ते, रसायनशास्त्र विभाग, नोव्हा विद्यापीठ, लिस्बन, पोर्तुगाल, डॉ. रीटा क्रावेरो, नोव्हा विद्यापीठ, लिस्बन, पोर्तुगाल आणि प्रा. पेट्रीशिया थॉर्नली क्रावेरो, संचालक, सेंटर फॉर डॉक्टोरल ट्रेनिंग इन निगेटिव्ह एमिशन टेक्नॉलॉजीज, युनायटेड किंगडम या शास्त्रज्ञांचा समावेश आहे.

या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये देशभरातील विविध संस्थांमधून संशोधक विद्यार्थी, शास्त्रज्ञ, प्राध्यापक सहभागी होणार आहेत. ही परिषद केवळ वैज्ञानिक संशोधनासाठीच नव्हे, तर भविष्यातील शाश्वत विकास आणि हरित रसायनशास्त्राच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. संशोधक, विद्यार्थी आणि विज्ञानप्रेमींनी या ऐतिहासिक परिषदेचा भाग होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन  डॉ. अंजना. लावंड यांनी केले आहे.    https://forms.gle/WnsA19ScsCxJGaSP6 या लिंकवर आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी नोंदणी करता येणार आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login