सोलापूर बातमीसोलापूर सामाजिक

वर्ल्ड ऑफ वूमन WOW तर्फे सोलापूर उत्तर तहसील कार्यालयात पाणपोई, सावली साठी जाळीची व्यवस्था…

सोलापूर – येथील कुंकुबाई नेत्र रुग्णालय चे ठिकाणी असलेल्या उत्तर तहसील कार्यालयात DBT साठी येणाऱ्या विधवा, घटस्फोटीत परितक्या दिव्यांग महिलांसाठी सोलापुरातील सामाजिक संस्था WOW अर्थात वर्ल्ड ऑफ वुमन तर्फे कडक उन्हाळ्यात सावली आणि थंड पाण्याची सोय करण्यात आली असून आज सदर पाणपोईचे उद्घाटन महिला व बालकल्याण विभागाचे विभागीय आयुक्त श्री.माने साहेब यांचे हस्ते, WOW च्या अध्यक्षा सौ.विद्या लोळगे, सचिव मारता आसादे, सहसचिव शोभा गायकवाड, कार्याध्यक्ष यशोदा सोनवणे यांच्या सह श्रीमती लता ढेरे, सामाजिक कार्यकर्त्या उज्ज्वला पाटील यांचे सोबत गीता मुळे, सरोजिनी जाधव, मीना जाधव, प्रमिला स्वामी, आशा शिंदे या महिला तसेच नोंदणी साठी आलेल्या इतर अनेक महिला भगिनी उपस्थित होत्या.

उत्तर तहसील कार्यालयात डीबीटी साठी दररोज ग्रामीण भागातून कमीत कमी 400 – 500 महिला येत असून सध्याचा कडक उन्हाळ्याच्या दिवसात तहसील कार्यालयाची नोंदणी खिडकीमध्ये रांगेत उभे असताना त्या महिलांना सावलीची तसेच पिण्याच्या पाण्याची बाहेरच्या बाजूस सोय नसल्याने तसेच काही वृद्ध महिला रांगेत उभ्या असताना अचानक चक्कर येणे, थकवा येणे अशा गोष्टी घडत असल्याने वर्ल्ड ऑफ वूमन तर्फे नोंदणी खिडकी चे वर सावली साठी हिरवी जाळी तसेच समोरच पिण्याचे पाण्याची सोय म्हणून पाणपोई जिथे रोज २० थंड पाण्याचे जार उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे अध्यक्ष सौ.विद्या लोलगे यांनी सांगितले तर उद्घाटन नंतर श्री.माने यांनी WOW या सामाजिक संस्थेतर्फे महिलांसाठी करण्यात आलेल्या या सोयीचे कौतुक करताना याचा फायदा गरीब गरजू महिलांना होणार असल्याचे सांगितले.

अश्याच पद्धतीने शहरातील आणि दक्षिण तहसील मध्ये देखील महिलांसाठी सोय लवकरच करण्यात येणार असल्याचे विद्या लोलगे यांनी सांगितले. यावेळी श्री. सी ए बिराजदार, श्री.मिलिंद गोरे, श्री.तात्या भोसले हे देखील उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login