क्राईमसोलापूर क्राईमसोलापूर बातमीसोलापूर सामाजिक
सोलापूर ब्रेकिंग : स्वतःवर गोळी झाडून डॉक्टरांची आत्महत्या…

सोलापूर शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे.
सोलापूर शहरातून अतिशय धक्कादायक माहिती समोर आली असून शहरातील प्रसिद्ध मेंदू विकार तज्ञ डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी स्वतःच्याच डोक्यात गोळी झाडून घेतल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
शुक्रवार दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान ही घटना त्यांच्या सात रस्ता परिसरातील सोनामाता शाळेच्या शेजारी असलेल्या बंगल्यात घडली असल्याची माहिती समोर येत आहे.
अशी माहिती मिळत आहे की, डॉक्टर वळसंगकर यांनी आपल्या निवासस्थानी रात्री साडेआठच्या सुमारास स्वतःच्या डोक्यात गोळी मारून घेतली त्यानंतर त्याच अवस्थेत कुटुंबीयांनी तातडीने त्यांचे स्वतःचे हॉस्पिटल असलेल्या मोदी स्मशानभूमी जवळील वळसंगकर हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले असता मयत झाल्याचे समजले.



