सोलापूर बातमी

आसरा युथ फाऊंडेशन तर्फे भव्य ग्रँड मास्क मस्जिद देखावा…

सोलापूर :
ईद-ए-मिलादुन्नबी पैगंबर जयंतीनिमित्त आसरा युथ फाऊंडेशन तर्फे आसरा चौक येथे भव्य ग्रँड मास्क मस्जिद देखावा साकारण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शोएब चौधरी यांनी केले.

या वेळी विविध मान्यवरांनी उपस्थित राहून देखाव्याला भेट दिली. त्यामध्ये एमआयएम पक्षाचे शहराध्यक्ष फारुक शाब्दि, आमदार इद्रिस नाईकवाडी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान तसेच छत्रपती मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष मतीन बागवान यांचा समावेश होता.

देखाव्याच्या उद्घाटनावेळी मान्यवरांनी आसरा युथ फाऊंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणात एकोपा, बंधुभाव आणि समाजातील ऐक्य वृद्धिंगत करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्व अधोरेखित केले.

शोएब चौधरी यांनी गेल्या काही वर्षांत सामाजिक तसेच धार्मिक क्षेत्रात राबविलेल्या कार्यामुळे फाऊंडेशनने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. गरजूंना मदत, शैक्षणिक प्रोत्साहन, तसेच सामाजिक सलोखा यावर भर देत फाऊंडेशनने तरुणाईला बांधिलकीची दिशा दिली आहे.

आसरा चौकातील हा भव्य देखावा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. प्रकाशयोजना, सजावट आणि आकर्षक रचना यामुळे हा देखावा सोलापूरकरांसाठी विशेष आकर्षण ठरला….

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel