सोलापूर राजकीयमहाराष्ट्रराजकीयसोलापूर बातमीसोलापूर महानगरपालिका
सोलापुर महापालिकेत कमी वयाच्या उमेदवाराचा मान भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पूजा श्रीकांत वाडेकर…

भारतीय जनता पक्षाच्या पूजा श्रीकांत वाडेकर वय 23 ह्या सर्वात कमी वयाच्या विजयी उमेदवार ठरल्या आहेत, सोलापूर महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली, या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जास्तीत जास्त युवा मतदारांना या निवडणुकीत संधी दिली, पूजा श्रीकांत वाडेकर ह्यांनी प्रभाग क्रमांक 9 मधून निवडणूक लढवली. आणि प्रभाग क्रमांक 9 मध्ये संपूर्ण भारतीय जनता पक्षाचे पॅनल विजयी झाले,
पूजा श्रीकांत वाडेकर ह्या कमी वयाच्या उमेदवार आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या माध्यमातून प्रभागातील विकासकामांवर जास्तीत जास्त लक्ष देणार असल्याचे पूजा श्रीकांत वाडेकर यांनी सांगितले



