राष्ट्रसंत प्राथमिक शाळा व विश्वभूषण विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना अभिवादन…

अक्कलकोट रोडवरील सद्संकल्प शिक्षण समूहाच्या राष्ट्रसंत प्राथमिक शाळा व विश्वभूषण विद्यालय सोलापूर येथे स्त्री शिक्षणाच्या जननी आणि भारतीय समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित विनम्र अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुश्रीताई खंडागळे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून विश्वभूषण विद्यालयाचे मुख्याध्यापक सत्यवान पाचकुडवे उपस्थित होते. शाळेतील शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांनी सावित्रीमाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. रामचंद्र व्हनकडे यांनी सावित्रीमाईंच्या जीवनातील संघर्षावर प्रकाश टाकला आणि आजच्या काळातील स्त्री शिक्षणाचे महत्त्व विषद केले. प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक सत्यवान पाचकुडवे यांनी सावित्रीमाईंनी खडतर परिस्थितीत स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ कशी रोवली, याबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका मंजुश्रीताई खंडागळे यांनी सावित्रीमाईचे विचार अंगीकारण्याचे आवाहन केले.
सूत्रसंचालन बी. एन. गायकवाड यांनी केले.
शेवटी दिनेश भालशंकर यांनी आभार मानले…



