सोलापूर बातमीमहाराष्ट्रराजकीयसोलापूर राजकीय

शिवसेना (उबाठा) नूतन पदाधिकाऱ्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सत्कार…

सोलापुरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा होताच नव्याने निवड झालेल्या शहर उत्तर-मध्य जिल्हाप्रमुखपदी प्रताप चव्हाण, दक्षिण सोलापूर जिल्हाप्रमुखपदी शरणराज केंगनाळकर, सोलापूर लोकसभा प्रमुखपदी संजय पौळ तर महानगर प्रमुखपदी महेश धाराशिवकर यांची निवड करण्यात आली आहे.

या निवडीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सोन्या मारुती चौकातील मध्यवर्ती कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी मनसैनिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला.

याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर शहर अध्यक्ष जैनुद्दीन शेख मनसे विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे, शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष श्री.संतोष कुमार घोडके,मनसे वाहतूक सेनेचे शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर, जिल्हा संघटक प्रसाद कुमठेकर, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश कोळी, उपाध्यक्ष विश्वास गजभार, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष गणेश भोसले,समर्थ माळगे, अभिषेक इरकल व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व मनसैनिक उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login