सोलापूर बातमीमहाराष्ट्रशैक्षणिकसोलापूर सामाजिक

वडिलांच्या निधनाच्या दिवशी दिला पेपर; धनश्री पवारची जिद्द ठरली प्रेरणादायी…

सोलापूर – येथील शरदचंद्र पवार प्रशालेमध्ये इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत असणाऱ्या धनश्री पवारचे वडील भिकाजी पवार यांचे 20 फेब्रुवारी 2026 रोजी दुःखद निधन झाले होते . घरात वडिलांच्या अंत्यविधीची तयारी सुरू होती. प्रशालेचे मुख्याध्यापक तानाजी माने यांनी धनश्री व तिच्या नातेवाईकांना समजावून सांगत दोन तास अंत्यविधी पुढे ढकलायला लावून धनश्रीला दहावीचा मराठी पेपर देण्यासाठी घेऊन गेले होते. दीड तास धनश्रीने पेपर लिहून ती अर्ध्यातून वडिलांच्या अंत्यविधीला घरी आली होती . आज दहावीचा रिझल्ट लागला. मराठी विषयाला 65 मार्क घेऊन ती उत्तीर्ण झाली आहे. प्रशालेचे मुख्याध्यापक तानाजी माने , शिक्षक राजाराम शितोळे, नितीन मिस्कीन, श्रीराम बरगंडे, आनंद कोळी, श्वेता बाळशंकर, सुलक्षणा भरगंडे, अर्चना शिंदे, स्वाती नागटिळक, मंजुळा संगा, वैशाली सोनटक्के यांनी आज धनश्रीचा घरी जाऊन सत्कार केला व तिला शुभेच्छा दिल्या.
दहावीनंतर व्होकेशनल कोर्स एम एल टी करून स्वतःच्या पायावर उभा राहून वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे धनश्रीने सांगितले. सदर प्रसंगी धनश्रीची आई सुप्रिया पवार भाऊ विजय पवार व मोठी नुकतीच बारावी उत्तीर्ण झालेली बहीण वैष्णवी इत्यादी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia