सोलापूर बातमीsolapurpoliceक्राईममहाराष्ट्रसोलापूर क्राईम

सोलापूरात चोरट्यांचा धुमाकूळ! घरासमोर लावलेली ३० हजारांची दुचाकी अंधाराचा फायदा घेत लंपास!

सोलापूर शहरात दुचाकी चोरांनी अक्षरशः हैदोस घातला असून पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. सामान्य नागरिकाचे घरासमोर लावलेले वाहन देखील सुरक्षित राहिले नाही, असाच धक्कादायक प्रकार सलगर वस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी –

पोलीस ठाणे :- सलगर वस्ती पोलीस ठाणे, सोलापूर
गु.र.नं. २९६/२०२६ – भा. न्याय सं. कलम ३०३(२) प्रमाणे (चोरी)
घटनेची वेळ व ठिकाण :- दि. १८/१०/२०२६ रोजी रात्री ९.०० ते १०.०० वा. चे सुमारास, हुच्चेश्वर मठाजवळ, सोलापूर
गुन्हा दाखल :- दि. १९/१०/२०२६ रोजी रात्री ११.०० वा.
फिर्यादी :- मुलप कुरुमय्या अडाकुलु, रा. हुच्चेश्वर मठाजवळ, सोलापूर
आरोपी :- अज्ञात लबाड चोरटा
गेला माल :- ३०,०००/- रु. किमतीची सिल्व्हर रंगाची हिरो फॅशन प्रो मोटारसायकल क्र. MH १३ BH ००६४

काय आहे थरारक हकीकत?

यातील फिर्यादी मुलप अडाकुलु यांनी आपली सिल्व्हर रंगाची हिरो फॅशन प्रो मोटारसायकल दि. १८ रोजी रात्री ९ वाजता आपल्या राहत्या घराजवळ पार्क केली होती.

रात्रीच्या अंधारात दबा धरून बसलेल्या अज्ञात लबाड चोरट्याने फिर्यादीच्या संमतीवाचून, मुद्दाम लबाडीच्या इराद्याने अवघ्या एका तासात हात साफ केला आणि दुचाकी घेऊन पोबारा केला.

घरासमोरूनच गाडी चोरीला गेल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

या घटनेप्रकरणी सलगर वस्ती पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोहे.कॉ. १०९३ विधाते हे करीत आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel