महाराष्ट्रसोलापूर राजकीय

AIMIM पक्षाची महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धोरणात्मक बैठक

महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर AIMIM पक्षाची धोरणात्मक बैठक हैदराबाद येथे पार पडली. या बैठकीसाठी महाराष्ट्रातील महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक कामकाजावर सविस्तर चर्चा झाली.
बैठकीत AIMIM चे राष्ट्रीय अध्यक्ष असदोद्दीन ओवेसी तसेच प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांसाठी स्पष्ट रणनीती आखण्यात आली. कार्यकर्त्यांना जनतेशी थेट संपर्क साधण्याचे, स्थानिक प्रश्नांवर भक्कम पातळीवर जनआंदोलन उभे करण्याचे आणि अल्पसंख्याक, दलित, वंचित समाजाच्या प्रश्नांना अग्रक्रम देण्याचे निर्देश देण्यात आले.

मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, सोलापूर, जालना, परभणी, बीड अशा महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये AIMIM आपली उपस्थिती मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. यावेळी पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाकडून महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांना निवडणूकपूर्व तयारीसाठी आवश्यक मार्गदर्शन मिळाले.

बैठकीत बोलताना इम्तियाज जलील साहेब यांनी सांगितले की, “महानगरपालिका ही जनतेच्या रोजच्या आयुष्याशी निगडित असलेली सत्ता आहे. त्यामुळे जनतेच्या खऱ्या समस्या सोडवण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. आगामी निवडणुकांमध्ये AIMIM कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून लढा द्यावा.”

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login