सोलापूर क्राईममहाराष्ट्रसोलापूर बातमी

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मंगळवेढा येथे कारवाई चार किलो 128 ग्रॅम गांजा बाळगणाऱ्या युवकास अटक

अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक,सोलापूर ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे श्री संजय जगताप पोलीस निरीक्षक व तपास पथकांना जिल्ह्यातील अंमली पदार्थ विषयक कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.
त्यावरून पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी स्थानिक गणेश शाखेच्या सर्व तपास करणे जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे बाबत आदेशित केले होते. त्यामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल देवकर यांना इसम नामे शाहूअली धावड हा आज दिनांक 09 मे 2026 रोजी माचनूर0येथील उड्डाणपुलाचे बाजूस अमली पदार्थ गांजा हा घेऊन येणार असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली होती.
त्या माहितीवरून पोलीस निरीक्षक संजय जगताप स्थानिक गुन्हे शाखा यांनी कायदेशीर कारवाई करून माचनूर येथील उड्डाणपुलाचे बाजूस सर्विस रोडवर सापळा लावला होता. यामध्ये दुपारी तीन वाजण्याची सुमारास संशयित इसम मोटरसायकल वरून येत असल्याचे दिसले. त्या इसमास इशारा करून थांबण्यास सांगितले असता तो निघून जाऊ लागला असता त्याच जागी पकडण्यात आले असून त्याच्या पाठीवर असणारे सॅक मध्ये चार किलो 128 ग्रॅम गांजा मिळून आलेला आहे. त्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेकडून सविस्तर पंचनामा करून मंगळवेढा पोलीस ठाणे येथे इसम नामे शाहू आली धावड, राहणार ब्रह्मपुरी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच्याकडून चार किलो 128 ग्रॅम गांजा, मोटरसायकल, मोबाईल व सॅक असा एकूण 1, 27,660/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदरचा गांजा त्याने कुठून प्राप्त केला याबाबत अधिक तपास सुरू आहे.
सदरची कामगिरी ही माननीय श्री अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण माननीय श्री प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संजय जगताप पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री अमित बाबर सहाय्यक पोलीस निरीक्षक, व पोलीस अंमलदार श्री नीलकंठ जाधवर सलीम बागवान, विरेश कलशेट्टी, जयवंत सादुल, राहुल दोरकर, हरीश थोरात, अन्वर आतार, सुनील पवार,बाळराजे घाडगे,राजेंद्र गवेकर यांनी बजावली आहे

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel
Account Suspended
Account Suspended
This Account has been suspended.
Contact your hosting provider for more information.