एम ए पानगल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र दिना निमित्त *ध्वजा रोहण कार्यक्रमाचे आयोजन

युनियन एज्युकेशन सोसायटी संचलित शहरातील नामवंत उर्दू माध्यमिक शाळा एम ए पानगल अँग्लो उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स सोलापूर या शाळेत ध्वजा रोहण कार्यक्रमाचे* आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात युनियन एज्युकेशन सोसायटी संचलित एम ए पानगल अँग्लो उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, बेगम कमरुंन्नीसा कारीगर गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, महिला महाविद्यालय, यु. ई .एस प्रायमरी स्कूल चे शिक्षक , विद्यार्थी व पालक सहभागी झाले . या कार्यक्रमात निकहत नल्लामंदू, अल्ताफ सिद्दिकी, हाजरा रचभरे, रुखसाना शेख, आरिफ पठाण हे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजा रोहण करण्यात आले.
सदर कार्यक्रमाची सुरुवात अब्दुल्लाह कमिशनर या विद्यार्थ्याच्या तीलावत ए कुराण ने झाली. त्या नंतर आमिर बागवान व कमिशनर या विद्यार्थ्यांची संदर अशी भाषणे झाली.
या कार्यक्रमाट चे सूत्र संचालन डॉ. सुरय्या जहागीरदार (उपमुख्याध्यापिक . एम ए पानगल) व झाकीर हुसेन शाहपुरे यांनी केले.
या वेळी , सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार डॉ. हारून रशीद बागबान ( प्राचार्य एम ए पानगल ) व डॉ. सुरय्या जहागीरदार (उपमुख्याध्यापिक . एम ए पानगल) यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमात एम ए पानगल प्रशाले च्या एनसीसी कॅडेट्स, आर एस पी कॅडेट्स तसेच बेगम कमरून्नीसा च्या आर एस पी कॅडेट्स तर्फे संचालन करण्यात आले. सदर संचालणासाठी एन सी सी युनिट चे ए एन ओ आरिफ पठाण , नविद मूनशी, अब्दुल खालीक मुल्ला, सईदा दारूवाले, अनिसा नालबंद यांचे मार्ग दर्शन लाभले . या वेळी आफरीन दंडोती, तहसीन पागान, डॉ. निकहत शेख , मुहम्मद अली शेख ,वसीम नल्ला मंदू, जमील दखनी, देशमुख मॅडम , इश्तियाक तारानाईक , रियाज सय्यद, फरजाना नदाफ , फौजिया शेख , रजिया बिजापूरे, आफरीन शेख , इलियास सौदागर, मेहबूब सौदागर, व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या आयोजनात मेहमूद खतीब , मोहसीन माशाळ, आलिया इनामदार , उम्मे जमा पठाण , उजमा उस्ताद, नगमा मुजावर , इरम शेख, लुबना शाहपुरे, जेबा शेख, व इतर शिक्षकांचे व स्टाफ मेंबर्स चे सहकार्य लाभले.