महाराष्ट्र

KGF स्टार यशसोबत राधिकाला करायचं नव्हतं लग्न; ‘या’ एका कारणामुळे तिने दिला होता नकार

दाक्षिणात्य सुपरस्टार यश (yash) याची क्रेझ आज संपूर्ण जगभरात पाहायला मिळते. KGF या गाजलेल्या सिनेमामुळे तो रातोरात लोकप्रिय झाला. त्यामुळे त्याला ओळखत नाही असं म्हणणारा क्वचितच एखादा व्यक्ती सापडेल.

छोट्या पडद्यापासून अभिनयाची कारकिर्द सुरु करणाऱ्या यशने आज साऊथ इंडस्ट्रीत त्याचं भक्कम स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे त्याच्याविषयी सोशल मीडियावर दररोज असंख्य चर्चा रंगतात. यामध्येच सध्या त्याची लव्हस्टोरी चर्चेत आली आहे. अनेक तरुणींचा क्रश असलेल्या यशला त्याच्या पत्नीने राधिकाने सुरुवातीला चक्क रिजेक्ट केलं होतं. इतकंच नाही तर तिचा होकार मिळावा यासाठी यशने ६ महिने वाट पाहिली होती.

साऊथमधील लोकप्रिय कपलमध्ये यश आणि राधिका यांच आवर्जुन नाव घेतलं जातं. २०१६ मध्ये या जोडीने लग्नगाठ बांधून त्यांच्या संसाराची सुरुवात केली. मात्र, त्यांची लव्हस्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. एका मुलाखतीमध्ये यशने राधिकाला लग्नसाठी कसं तयार केलं हे सांगितलं.

“माझं तिच्यावर प्रेम आहे हे एवढंच तिला सांगण्यासाठी मी खूप प्रयत्न केले. पण, तिला कोणतीच हिंट मिळत नव्हती. त्यामुळे ती बुद्धू आहे असंच मला वाटायला लागलं होतं. माझ्या फोनमध्ये सुद्धा तिचा नंबर मी अजूनही बुद्धू याच नावाने सेव्ह केलेला आहे. त्यावेळी तिला प्रपोज करावं असं मला सतत वाटत होतं. पण, माझ्यात तेवढा आत्मविश्वास नव्हता. मला फार भिती वाटत होती. कारण, आम्ही खूप चांगले मित्र होतो. या सगळ्यात आमची मैत्री तुटू नये ही एकच भिती सतत मनात असायची. ती माझ्यासाठी खूप स्पेशल होती”, असं यश म्हणाला.

पुढे तो म्हणतो, “व्हॅलेंटाइन डेला मी निर्णय घेतला की काहीही करुन तिला प्रपोज करायचं. मी तिला फोन करुन विचारलं कुठे आहेस? तर ती मुव्ही पाहण्यासाठी कोरमंगला मॉलला जात होती. त्यामुळे मी सुद्धा त्या मॉलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तिला ज्या ज्या गोष्टी आवडतात त्या सगळ्यांचं मिळून एक छान गिफ्ट देऊयात असं मी ठरवलं. मी चॉकलेट्स, सॉफ्ट टॉईज वगैरे घेऊन मॉलमध्ये पोहोचलो. मी राधिकाला तिथे गेल्यावर प्रपोज केलं पण तिने माझ्या प्रपोजलचं उत्तरंच दिलं नाही. तिने उत्तर द्यायला ६ महिन्यांचा कलावधी लावला.”

दरम्यान, “मी तिला हवं त्या पद्धतीने प्रपोज केलं नाही अशी तिची तक्रार होती. राधिका आणि यश यांच्या लग्नाला ७ वर्ष झाली आहेत. त्यांना आर्य आणि यथर्व ही दोन मुलं सुद्धा आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login