सोलापूर बातमीखेळमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे मामा यांच्या जयंतीनिमित्त विभागीय निमंत्रित पुरुष खो-खो स्पर्धा बार्शी…

किरण स्पोर्टस्‌‍ सोलापूर, छत्रपती मंडळ धाराशिव अंतिम फेरीत

कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे मामा यांच्या 122व्या जयंतीनिमित्त सुरु असलेल्या पुरुष गटाच्या विभागीय निमंत्रित पुरुष खो-खो स्पर्धेत धाराशिवचे छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळ व सोलापूरच्या किरण स्पोर्टस्‌‍ क्लबने अंतिम फेरीत प्रवेश केला.
महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएसनच्या मान्यतेने ही स्पर्धा शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशनने आयोजित केली आहे. कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या कर्मवीर मैदानावर मंगळवारी सकाळी झालेल्या उपांत्य सामन्यात जितेंद्र वसावे (1.30, 1.40 मिनिटे संरक्षण) व श्याम ढोबळे (5 गुण) यांच्या शानदार खेळीमुळे छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळाने धाराशिवच्याच तुळजाभवानी क्रीडा मंडळावर 20-14 असा 6 गुणांनी पराभव केला. तुळजाभवानी मंडळाच्या रमेश वसावेने आक्रमणात 5 गडी बाद करीत 1.30 मिनिटे संरक्षण केले. त्याची व विशाल वसावे (1.50 मिनिटे व 2 गुण) यांची अष्टपैलू खेळी अपुरी पडली.

किरण स्पोर्टस्‌‍ने वेळापूरला नमविले
–—
उपांत्य फेरीच्या दुसरा सामना सोलापूर जिल्ह्यातील दोन संघात अत्यंत चुरशीचा झाला. वेळापूरच्या अर्धनारी नटेश्वर क्रीडा मंडळाला सोलापुरच्या किरण स्पोर्टस्‌‍ क्लबने मध्यंतराच्या 8-9 अश्या एका गुणाच्या पिछाडीवरून 17-16 असे एका गुणानेच नमविले. अक्षय इंगळे (1.00 मिनिटे व 4 गुण), सौरभ चव्हाण (1.30, 2.00 मिनिटे संरक्षण व 2 गुण), चेतन चव्हाण (2 मिनिटे व 3 गुण) व रोहन रजपूत (1.10,1.20 व 1गुण) हे त्यांच्या विजयाचे शिल्पकार ठरले. वेळापूरच्या कृष्णा बनसोडे (1.20, 1.20 मिनिटे व 1 गुण), प्रणव अडसूळ (1.20 मि. व 3 गुण) व अजित रणदिवे (1.00, 1.40 मि. व 2 गुण) यांची अष्टपैलू लढत अपुरी पडली.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login