महाराष्ट्र

अंतिम सामन्याचे व्हा साक्षीदार, अहमदाबादासाठी ही रेल्वे धावणार

नाव कोरण्यासाठी अंतिम सामना अहमदाबादमध्ये रंगणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळल्या जात आहे. रविवारी, 19 नोव्हेंबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया या विश्वचषकासाठी एकमेकांना टशन देतील.

भारताने 2011 नंतर पहिल्यांदा अंतिम सामन्यात धडक दिली आहे. टीम इंडिया आतापर्यंत अजिंक्य राहिली आहे. भारतीय टीमने एकही सामना गमावलेला नाही. भारत हा या विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानण्यात येतो. त्यामुळे अहमदाबादकडे क्रिकेटप्रेमींचे जत्थेच्या जत्थे निघाले आहेत. नरेंद्र मोदी स्टेडियमवर 1,30,000 हून अधिक प्रेक्षकांची आसनव्यवस्था आहे. विमानाचे तिकीट महागले आहे. त्यामुळे रेल्वे मुंबई ते अहमदाबादसाठी एका विशेष रेल्वे चालविणार आहे.

केव्हा सुटणार रेल्वे

मध्य रेल्वेनुसार, ही खास रेल्वे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून निघेल. शनिवारी रात्री 10.30 वाजता सुटणार आहे. ही रेल्वे सकाळी 6.40 वाजता अहमदाबाद येथे पोहचेल. आयसीसी वर्ल्डकपचा अंतिम सामना दुपारी 2 वाजता सुरु होणार आहे. 20 नोव्हेंबर रोजी 01.45 वाजता ही रेल्वे अहमदाबाद येथून निघेल आणि 10.35 वाजता मुंबईत पोहचेल. ही रेल्वे दादर, ठाणे, वसई रोड, सूरत आणि बडोद्यात थांबेल. या रेल्वेत एक एसी-फर्स्ट क्लास, तीन एसी-2 टायर आणि 11 एसी-3 टियर कोच असतील. या विशेष रेल्वेचे बुकिंग सुरु झाले आहे. प्रेक्षक ऑनलाईन पण या संकेतस्थळावरुन तिकिटाची बुकिंग करु शकतील.

विमानाच्या तिकिटाचे दर गगनाला

अहमदाबाद येथील हॉटेलचे भाडे गगनाला पोहचले आहे. विमानाच्या तिकिटाचे दर पण खूप वाढले आहेत. बेंगळुरु-अहमदाबाद या प्रवासाचे एरव्ही भाडे जवळपास 6,000 रुपये होते. पण शनिवारी याच मार्गावरील तिकिटाचे दर 33,000 रुपयांवर पोहचले. तर दुसऱ्या शहरातून अहमदाबादसाठी सुरु असलेल्या फ्लाईट्सच्या तिकिटात पण जबरदस्त वाढ झाली आहे. अनेक पटीने हे दर वाढले आहेत. दिल्ली ते अहमदाबाद विमानाचे दर एरव्ही 4,000 रुपये आहेत. तर मेकमायट्रिप नुसार सध्या हे दर 20,045 रुपयांच्या घरात पोहचले आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel