सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर अपघात
अक्कलकोटहून गाणगापूरला जाताना भाविकांवर काळाचा घाला; चौघांचा दुर्दैवी मृत्यू

नवीन वर्षी देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला झालाय. स्कॉर्पिओ आणि आयशर ट्रकचा भीषण अपघात सोलापूरच्या मैंदर्गी जवळ झाला आहे. या अपघातात 2 महिला आणि 2 पुरुष अशा चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 7 ते 8 भाविक प्रवासी जखमी आहेत.
अक्कलकोट श्री स्वामी समर्थ दर्शन घेऊन गाणगापूरला जातं असताना नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भविकांवर काळाचा घाला झाला आहे. सोलापूरच्या मैंदर्गी जवळ स्कॉर्पिओ आणि आयशर ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाला. समोरासमोर झालेल्या या अपघातात 2 महिला आणि 2 पुरुष जागीच ठार झाले आहेत. तर 7 ते 8 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व भविण नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातस्थळी अक्कलकोट पोलीस दाखल झाले असून जखमीना तातडीने अक्कलकोट सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.