सोलापूर बातमी
सोलापूर सहाय्यक कामगार आयुक्तांच्या लेखी आश्वासनांनंतर किमान वेतन कृती समितीचे आंदोलन मागे

महाराष्ट्र किमान वेतन कृती समितीच्या वतीने किमान वेतन आंमलबजाणीसाठी होत असलेल्या दिरंगाई बाबत १५ ऑगस्ट या दिनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता परंतु सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर यांनी याबाबत वरिष्ठ पातळीवर लवकरच बैठक आयोजित करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर सदर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी करण्यात येणार आंदोलन स्थगिती करण्यात आला आहे.
असे पत्रक
महाराष्ट्र किमान वेतन कृती समितीच्या वतीने डॉ. गोवर्धन सुंचू, विष्णू कारमपुरी (महाराज) सायबण्णा तेग्गेळी, राहुल गुजर यांनी संयुक्तपणे प्रसिद्धी दिली आहे.