solapurpoliceमहाराष्ट्रसोलापूर क्राईमसोलापूर बातमी

सोलापूर : वाहने घेण्यासाठी माहेरून 6 लाखांची मागणी; 23 वर्षे छळ सहन करणाऱ्या विवाहितेची पती-सासूविरुद्ध गुन्हा दाखल

सोलापूर : लग्नानंतर संसारोपयोगी सामान, सोने-पैसे न देता उलट किरकोळ कारणावरून मारहाण, शिवीगाळ व चारित्र्यावर संशय घेऊन अपमानित केल्याप्रकरणी 42 वर्षीय विवाहितेने पती व सासूविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. नवीन रिक्षा व चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरून 6 लाख रुपये आण, अशी मागणी करत घटस्फोटाची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

 

फिर्यादी लता संतोष भिसे (वय 42, रा. 53, न्यु शिवाजी नगर, गोंधळे वस्ती, सोलापूर) यांचा सन 2003 पासून 15 मे 2026 पर्यंत सासरी छळ झाला. दि. 9 जून 2026 रोजी दुपारी 2.13 वा. त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

 

आरोपींची नावे :

1. संतोष – पती

2. शकुंतला – सासू

दोघे रा. नविन बाजारतळ, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर

 

हकीकतीनुसार, आरोपींनी फिर्यादीस संसारोपयोगी सामान दिले नाही, सोने-पैसे दिले नाहीत, योग्य मानपान केला नाही. घरातील किरकोळ कारणावरून घालून पाडून बोलून अपमानित केले व फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ केली.

 

तसेच माहेरून नवीन रिक्षा व नवीन चारचाकी गाडी घेण्यासाठी सहा लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी केली. पैसे न दिल्यास मारहाण करून घटस्फोट देण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली. यामुळे फिर्यादीस मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला.

 

या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाणे गु.र.नं. 568/2026 नुसार भा.न्याय संहिता कलम 85, 115(2), 351(2), 352, 3(5) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोहेकॉ/145 मुजावर (मो. 7020634136) करीत आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel
404 Not Found