सोलापूर सामाजिकमहाराष्ट्रसोलापूर बातमी

अजून_एका_व्यक्तीस_जीवदान_देण्याच्या_प्रयत्न…

अक्कलकोट: अक्कलकोट कापड बाजार मेन रोड उन्नद दुकानासमोर पायऱ्यावर एक बेवारस व्यक्ती पडली होती. दुकान उघडण्यासाठी त्या व्यक्तीस उचलून दुकानाच्या बाजूला रोडच्या कडेस त्या व्यक्तीला ठेवण्यात आले होते.
मेन रोड असल्याकारणाने त्या रोडवर अनेक लोकांची येजा होत होती परंतु कोणीही त्या अनोळखी व्यक्तीकडे जवळ जाऊन ती व्यक्ती जिवंत आहे की मेली आहे पाहण्यासाठी लोकांकडे वेळ नव्हता.
पोलिसांचा लपडा आपल्या पाठीमागे नको म्हणून कोणीही रस्त्यावर ये-जा करणारे लोक या व्यक्तीच्या मदतीसाठी पुढे आले नाही.
शेवटी विपुल दोशी यांनी रोडवरील बेवारस मनोरुग्णाची फोन करून मला माहिती दिली की मेन रोडवर एक बेवारस व्यक्ती पडली आहे आणि ती व्यक्ती जिवंत आहे तात्काळ त्याला दवाखान्याला नेलंतर तो वाचु शकतो नाहीं तर तो व्यक्तीचा रोडवरच मुर्त्यु होईल.
मग लगेच सोहेल फरास मी आमचे सहकारी मित्र समीर शेख यांना कॉल करून सांगितलं आणि समीर शेख यांनी कोणतेही विलंब न करता लगेच आपली रिक्षा व आमचे सहकारी मित्र मोहम्मद शिकलगार यांना घेऊन त्या ठिकाणी पोहोचले,आणि आम्ही तिघांनी मिळून त्या व्यक्तीस उचलून रिक्षामध्ये टाकून ग्रामीण रुग्णालय नेऊन त्या सदर बेवारस व्यक्तीचा केस पेपर काढून पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट येथे ऍडमिट केले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नन्नूभाई कोरबू व अविनाश मडीखांबे यांनीही दवाखान्याला येऊन भेट दिली व डॉक्टरांना उपचार करण्यास सांगितले.
डॉक्टरांनी त्या व्यक्तीची तपासणी केली तपासणी करताना त्या सदर व्यक्तीचा एक हात फ्रॅक्चर झाला आहे असे आढळून आले डॉक्टरांनी त्या व्यक्तीस पहिल्यांदा सलाईन लावून नंतर त्या व्यक्तीच्या हाताची एक्स-रे काढू व पुढील उपचार करू अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
सदर व्यक्ती दोन-तीन दिवसापासून जेवण केला नसावा त्यामुळे तो अशक्त झाला होता त्याला स्वतःहून उठता बसता येत नव्हते त्या व्यक्तीस नाश्ता उपीट खाऊ घातले त्यानंतर त्या व्यक्तीस सलाईन लावण्यात आली.
सदर व्यक्तीच्या नातेवाईकापर्यंत ही बातमी पोहचणे गरजेचे आहे तरी सर्वांनी कृपया करून ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करून माणुसकीच्या या सामाजिक कार्यात सहभागी होऊन या व्यक्तीच्या घरच्यापर्यंत नातेवाईकापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी प्रयत्न करूया व या व्यक्तीच्या नावापुढे जी बेवारस म्हणून नोंद झाली आहे ती खोडून काढण्याचा प्रयत्न करू.
या संपूर्ण कार्यात मदत म्हणून सोहेल फरास मला समीर शेख, महंमद शिकलगार,नन्नूबाई कोरबू व अविनाश मडीखांबे इरफान भाई या सर्वांचा मनापासून

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel