सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर राजकीयसोलापूर सामाजिक

अतिवृष्टीग्रस्त मदतीच्या यादीतून सोलापूर जिल्ह्याला वगळले…

निवेदनाद्वारे मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन उभे करु असा इशारा सामाजिक कार्यकर्ते.पैलवान माऊली हेगडे यांनी दिला.अन्यथा विधानसभा निवडणुकीत हिसका दाखवू…

अतिवृष्टी झालेला सोलापूर जिल्ह्याबरोबरच मोहोळ तालुका मदतीपासून वंचित राहिल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत सरकार विरोधात रोष व्यक्त केला आहे. तात्काळ अतिवृष्टी झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेती पिकांचे पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पै. माउली हेगडे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री,मदत व पुनर्वसन मंत्री आणि जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे केली आहे.

सोलापूर जिल्ह्यात परतीचा मान्सूनचा पाऊस पडत असतो.तो कालावधी साधारण 15 दिवस ते एक महिना असतो त्यावरच खरीप पिके अवलंबून असतात. मात्र चालू वर्षी मान्सून आगमनापासून सोलापूर जिल्ह्यात पाऊस दाखल होवून सतत संततधार पावसामुळे शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा सामना करावा लागत आहे. मागील महिनाभरापासून सतत पाऊस असल्याने पिके धोक्यात आली आहेत. अनेकांच्या पेरण्या आणि पिकाची लागवड वाया गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या पिकांच्या नुकसानीबाबत शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते पै माऊली हेगडे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री आणि जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे केली आहे.

सोलापूर जिल्ह्यात सतत सुरू असलेला पाऊस तसेच पुणे भागामध्ये पडलेल्या पावसामुळे उजनी धरणावरील सर्व धरणे भरल्यामुळे अतिरिक्त पाणीसाठा उजनी मध्ये सोडण्यात आलं आहे. त्यामुळे उजनी धरणे शंभर टक्के भरले आहे. सोलापूर जिल्ह्यातील आणि पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे नदी, नाले आणि ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे शेती पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ अतिवृष्टी ग्रस्त भागातील शेती पिकांचे पंचनामे करावे आणि तात्काळ मदत द्यावी अन्यथा विधानसभा निवडणुकीत मतदानावरच बहिष्कार घालण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते पै माऊली हेगडे यांनी दिला आहे.

चौकट
राज्यात सर्वाधिक पावसाची नोंद ही मोहोळ तालुक्यात झाली असून मात्र शासनाकडून कुठलेही पंचनामे झाले नाहीत अथवा अतिवृष्टी ग्रस्त भागाच्या मदत यादीत सोलापूर जिल्ह्याचा समावेश नाही.त्यामुळे राज्यातील फक्त 26 जिल्ह्यांना मदत मिळणार आहे.अतिवृष्टी ग्रस्त भागातील सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील मदतीचा हात मिळावा.
सामाजिक कार्यकर्ते पै. माउली हेगडे

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel