महाराष्ट्र
अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!
एका अत्यंत धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती गर्दीच्या ठिकाणी अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन करत असल्याचं दिसत आहे. व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून आरोपी व्यक्तीविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे.
‘फ्री प्रेस जर्नल’ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीच्या सदर बाझारमधील हा धक्कादायक प्रकार आहे. एक व्यक्ती गर्दीचा फायदा घेऊन लाजिरवाणे कृत्य करताना दिसत आहे. व्हिडिओमधील पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचं सांगितलं जात आहे. व्यक्तीची अद्याप ओळख होऊ शकलेली नाही. शिवाय पोलिसांनी याप्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याचं समजतंय.