अनंत चतुर्दशी निमित्त महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केली सर्व विसर्जन कुंडाची पाहणी….
तीन फुटावरील अनेक श्री गणेश मुर्तीचे व शहरातील संकलित करण्यात आलेले श्री गणेशाची मूर्तीचे तुळजापूर रोड येथील खाणीत विधिवत विसर्जन !
अनंत चतुर्दशी निमित्त श्री गणेश विसर्जनासाठी महापालिका प्रशासनाकडून तुळजापूर रोड येथील खाणीत व्यवस्था करण्यात आली. सकाळी महापालिकेचे आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या हस्ते संकलीत केलेल्या श्रीगणेश मुर्तीची विधीवत आरती करण्यात आली. विधीवत श्री गणेशाची पुजा झाल्या नंतर “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या !” च्या जय घोष करण्यात आला. क्रेनच्या सहाय्याने खाणीत उतरून श्री गणेशाची मुर्तीचे मनोभावे विसर्जन करण्यात आले. याप्रसंगी याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप,नगर अभियंता सारिका आकुलवार,कार्यकारी अभियंता विद्युत राजेश परदेशी, सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, नागेश मेंडगुळे, विभागीय अधिकारी श्री लोखंडे, उप अभियंता किशोर सातपुते अभिजीत बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते.सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने गणेशोत्सवाच्या विसर्जनाकरिता 11 विसर्जन कुंड तर 78 संकलन केंद्र उभारण्यात आले असून त्या ठिकाणी श्री गणेशाची मूर्ती संकलनासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे . तसेच विविध ठिकाणाहून संकलन केलेल्या श्री गणेश मूर्तीचे विसर्जन हे तुळजापूर येथील खाणीत विधिवत पूजा करून करण्यात येत आहे.तुळजापूर रोड येथील खाण, विष्णू घाट,गणपती घाट त्याचबरोबर घरकुल येथील माढा विहीर तसेच इतर विसर्जन कुंड, गणपती विसर्जना करीता नागरिकांची मोठ्या प्रमाणात येत आहेत. या ठिकाणी विधिवत पूजा करून श्री गणेशाचे विसर्जन करण्यात येत आहे. सोलापूर महापालिकेच्या वतीने श्री गणेश विसर्जनासाठी श्री ची मूर्ती संकलनासाठी व विसर्जनासाठी 7 क्रेन,3 होडी व 104 गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून त्याचबरोबर 18 घंट्याकडे 3 आरसीएस गाड्यासह 8 मुख्य आरोग्य निरीक्षक,50 आरोग्य निरीक्षक,180 सफाई कर्मचारी तसेच गणेश मूर्ती संकलना केंद्र व विसर्जन कुंड येथे 900 मजूर इत्यादी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आले आहे. तसेच हिप्परगा खाण, नियोजन भवन,जगदंबा चौक,पद्मशाली चौक, नवी वेस पोलीस चौकी या अग्निशामक विभागाचे गाड्या उभे करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर डॉक्टर सह ॲम्बुलन्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच सर्व विसर्जन कुंड्यातील सालाबादप्रमाणे बॅरिगेटिंग, फ्लेक्स,मंडप,लाईट, स्पीकर इत्यादीची सोय करण्यात आली असून त्याचबरोबर कंबर तलाव,गणपती घाट,हिप्परगा खान येथे सी.सी.टीव्हीच्या माध्यमातून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे . सोलापूर शहरात श्री गणेश विसर्जन त्यानिमित्ताने महापालिका आयुक्तांनी पर्यावरण पूरक मूर्तीचे शक्यतो घरच्या घरीच विसर्जन करावे, असे आवाहन केले आहे. ज्यांना शक्य नाही अशांसाठी विविध 78 ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र ठिकाणी सर्व नागरिकांनी मूर्ती संकलित करावे. तेथून महापालिकेच्या वतीने खाणीपर्यंत नेण्याची आणि विसर्जन करण्याची सोय करण्यात आली आहे. तीन फुटावरील श्री गणेश मूर्तींचे विसर्जन तुळजापूर रोडवरील खाणीत करण्याचे नियोजन आहे तरी विविध मंडळांनी यासाठी महापालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन महापालिका शीतल तेली- उगले यांनी केले आहे.